राहुल गांधी बॅरिकेडवर चढले, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात; निवडणूक आयोगाच्या कार्यालयाजवळ राडा

मुंबई तक

06 Oct 2026 (अपडेटेड: 06 Oct 2026, 01:04 PM)

IndIa Bloc Protest : इंडिया ब्लॅकच्या खासदारांनी संसदभनव सोडलंय आणि ते निवडणूक भवनाकडे जाताना दिसत आहेत. अशातच विरोधकांच्या आंदोलनादरम्यान विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी हे बॅरिकेडवर चढलेले दिसत आहेत. 

IndIa Bloc Protest

IndIa Bloc Protest

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

राहुल गांधी आणि प्रियांका गांधींसह अनेकांची धरणे आंदोलन

point

राहुल गांधींनी बॅरिकेडवर चढून राष्ट्रध्वज फडकवला

IndIa Bloc Protest : इंडिया ब्लॅकच्या 140 हून अधिक खासदारांनी निवडणूक आयोग आणि एसआयआरच्या विरोधात संसद भवनापासून निर्वचन सदनपर्यंत मोर्चा काढला. दिल्ली पोलिसांनी 3 हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करून सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. इंडिया ब्लॅकच्या खासदारांनी संसदभनव सोडलंय आणि ते निवडणूक भवनाकडे जाताना दिसत आहेत. अशातच विरोधकांच्या आंदोलनादरम्यान विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी हे बॅरिकेडवर चढलेले दिसत आहेत. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Astrology : बुध आणि शनीमुळे षडाष्टक योगाची निर्मिती, 'या' राशींना सावधानतेचा इशारा

राहुल गांधी आणि प्रियांका गांधींसह अनेकांची धरणे आंदोलन

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अधिकच कडक करण्यात आली आहे. विरोधी पक्षांचे नेते आणि खासदार राहुल गांधी या निषेध मोर्चात सामील झाले आहेत. पोलिसांनी निवडणूक केंद्राजवळ बॅरिकेड्स उभारून इंडिया ब्लॅकच्या नेत्यांना अडवले. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह अनेक विरोधी खासदारांनी तिथे धरणे आंदोलन केले आहे. 

हे ही वाचा : .. तर मी कोणाचेही पाय धरायला तयार - राज ठाकरे

राहुल गांधींनी बॅरिकेडवर चढून राष्ट्रध्वज फडकवला

इंडिया ब्लॉकचे नेते निवडणूक सभागृहाकडे मोर्चा काढताना दिसत आहेत. दरम्यान, राहुल गांधी यांनी पोलिसांना बॅरिकेडवर चढून राष्ट्रध्वज फडकवला. भाजप अस्वस्थ असल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केला. त्यांनी भाजपवर पोटनिवडणुकांमध्ये मोठा गैरप्रकार केल्याचा आरोप केला आहे. तसेच समाजवादी पक्षाचे खासदार झिया-उर-रहमान बर्क यांनी त्यांच्या सहकारी खासदारांसह निवडणूक आयोगाकडे जाताना नीती आयोग कार्यालयाजवळ पोलिसांना बॅरिकेड ओलांडला होता. 

भाजप निवडणूक आयोगासाठी काम करते - अखिलेश यादव

समाजवादी पक्षाचे खासदार झिया-उर-रहमान बर्क यांनी त्यांच्या सहकारी खासदारांसह निवडणूक आयोगाकडे जाताना नीती कार्यालयाजवळ पोलिसांचा बॅरिकेट ओलांडला. एवढंच नाही,तर अखिलेश यादव यांनी निवडणूक आयोगावर भाजपसाठी काम करत असल्याचा आरोप केला. त्यांनी पुढे निष्पक्षतेवर प्रश्न केला की, निवडणूक आयोग निष्पक्ष नसून संविधानानुसार काम करत नाही, असं ते म्हणाले.