.. तर मी कोणाचेही पाय धरायला तयार - राज ठाकरे

मुंबई तक

Raj Thackeray : जर वेळ पडली तर मराठी तरुण तरुणींच्या नोकऱ्यांसाठी जर कोणाचे पाय धरायला लागले तरीही मी पाय धरेन, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान उपस्थितांना संबोधित केले. 

ADVERTISEMENT

Raj Thackeray
Raj Thackeray
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

"तुम्ही जातीपातीत पडू नका, धर्मांत तुम्हाला अडकवून टाकतील"

point

.. तर हा राज ठाकरे कोणाचेही पाय धरायला तयार

Raj Thackeray : "गेली काही दिवस आपले अनेक बांधव या ठिकाणी आहेत, कुणी उपोषणाला बसलेत. या ठिकाणी अनेकजण येताहेत. काही लोक सांगतात की, आम्ही तुमच्या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचं सांगताहेत, मात्र मी तुमच्या रागात सामील होण्यासाठी आलेलो आहे. हा तुम्हाला राग तात्पुरता असू नये. देशभरात हे आंदोलन सुरू आहे, मुंबईत मतांच्या चोरीवरून आंदोलन झाले. तुमच्याकडे पेपरफुटी होते आणि आमच्याकडे मत फुटताहेत. जर वेळ पडली तर मराठी तरुण तरुणींच्या नोकऱ्यांसाठी जर कोणाचे पाय धरायला लागले तरीही मी पाय धरेन, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान उपस्थितांना संबोधित केले. 

हे ही वाचा : जळगाव हादरलं! बस पकडण्यासाठी धावत गेलेल्या विद्यार्थिनीचा चिरडून मृत्यू

"तुम्ही जातीपातीत पडू नका, धर्मांत तुम्हाला अडकवून टाकतील"

पुढे ते म्हणाले की, "एकेक वर्षे निघून जातात, जशी तुमच्या आयुष्यातील वर्षे निघून गेलीत, तशी आमच्याही आयुष्यातील वर्षे निघून गेलीत. संपूर्ण देशभरात बेबंधशाही सुरू आहे, कोणीही कोणाचे काहीही ऐकत नाही. एकाच बाजूने मन की बात सुरू आहे. प्रत्यक्षपणे या देशात परिस्थिती काय आहे, या राज्यात काय आहे, हे पाहावे. तुम्ही जातीपातीत पडू नका, धर्मांत तुम्हाला अडकवून टाकतील. यातच जर तुमचा वेळ गेल्यास आई वडिलांना घरी जाऊन काय तोंड दाखवाल?," असा प्रश्न राज ठाकरे यांनी केला. 

"अनेक मुलं कर्ज काढून आलेत, त्यांच्या आई वडिलांनी कोणत्या पद्धतीने शिकवलं याची जाणीव असेलच. या देशात अनेक प्रश्न निर्माण झालेत, मात्र हेच प्रश्न मिटवण्यासाठी बाकीच्या गोष्टिंमध्ये तुम्हाला अडकवलं जातंय, त्यातून आधी तुम्ही बाहेर या", असं राज ठाकरेंनी उपस्थितांना संबोधित केले. 

हे ही वाचा : बायकोचा दुसऱ्याच पुरुषावर जीव, दारूचे आमिष दाखवून नवऱ्याला जंगलात पुरलं

.. तर हा राज ठाकरे कोणाचेही पाय धरायला तयार

त्यानंचर ते म्हणाले की, "दुसरं सरकार आलं तरीही ते 70 हजार विद्यार्थ्यांना नोकऱ्या देऊ शकत नाही. परिस्थिती आधी समजून घेतली पाहिजे, वस्तुस्थिती समजून घ्या आणि अशा स्थितीत नोकऱ्या मिळाल्याच पाहिजेत. मी गेली अनेक वर्षांपासून सांगतोय की, जे काही काम धंदे आहेत ते माझ्या महाराष्ट्रातील मराठी तरुण तरुणींना मिळाव्यात. तुमचा इथे विचारच केलेला नाहीये, सर्व खाजगीकरण सुरू आहे आणि खाजगीकरणात आरक्षण नाहीये, हे सर्व तुम्हाला गृहीत धरून सुरू आहे', वेळ पडली तर हा राज ठाकरे मराठी तरुण तरुणींच्या नोकऱ्यांसाठी पाय धरायला लागले तरीही धरेन, असं म्हणत राज ठाकरे यांनी विद्यार्थी आंदोलकांना संबोधित केले.