बायकोचा दुसऱ्याच पुरुषावर जीव, दारूचे आमिष दाखवून नवऱ्याला जंगलात पुरलं

मुंबई तक

Crime News : महिलेनं आपल्या पतीला दारूचे आमिष दाखवून जंगलात नेले होते. नंतर प्रियकराच्या मदतीने विवाहबाह्य प्रेमप्रकरणातून त्याची हत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली.  या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.

ADVERTISEMENT

crime news (AI Photo)
crime news (AI Photo)
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

बायकोने नवऱ्याला जंगलात पाजली दारू

point

जंगलातील खड्ड्यात पतीचा मृतदेह 

Crime News : महिलेनं आपल्या पतीला दारूचे आमिष दाखवून जंगलात नेले होते. नंतर प्रियकराच्या मदतीने विवाहबाह्य प्रेमप्रकरणातून त्याची हत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली.  या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. या प्रकरणात मृत व्यक्तीची मदन मुखिया अशी ओळख समोर आली. हत्येनंतर मदन मुखिया यांचा मृतदेह जंगलातील एका खड्ड्यात फेकून देण्यात आला. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली. ही घटना उत्तराखंडच्या डेहराडूनच्या प्रेमनगर येथे घडल्याचे वृत्त आहे.

हे ही वाचा : विवाहबाह्य प्रकरणाबाबत बायकोनं नवऱ्याला विचारला जाब, पतीने धारदार शस्त्राने संपवलं

जंगलातील खड्ड्यात पतीचा मृतदेह 

या प्रकरणी पोलिसांनी सांगितलं की, मानी देवी (वय 30) आणि तिचा कथित प्रियकर लल्लन शर्मा (वय 23) या दोघांनाही अटक करण्यात आली. शनिवारी मांडुवालाच्या जंगलातील एका खड्ड्यात मुखियाचा मृतदेह आढळून आला होता. त्याच्या मानेवर धारदार शस्त्राने जखम झाली होती. प्राथमिकदृष्ट्या मानेवरील ही हत्या असल्याची माहिती सूचित करते. 

या प्रकरणात मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवल्यानंतर, घरमालक सुरेंद्र सिंह यांच्या तक्रारीवरून खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात आला होता, पोलिसांनी आपले काही पथक आरोपींच्या शोधासाठी पाठवली आणि सीसीटीव्हीचे व्हिडिओ पाहून पोलिसांनी लल्लन शर्माचा माग काढून त्याला अटक केली. 

तक्रारीत आरोपी लल्लन शर्मा यांनी नमूद केले की, दोघेही मजूर म्हणून कार्यरत होते. गेली दोन-तीन वर्षांपासून त्याचे आणि मीनाचे प्रेमसंबंध होते. शर्माने पोलिसांना असे सांगितलं की, काही दिवसांपूर्वी मुखियाला त्यांच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाली असता, त्यांनी पतीला संपवण्याचा कट रचला होता.