विवाहबाह्य प्रकरणाबाबत बायकोनं नवऱ्याला विचारला जाब, पतीने धारदार शस्त्राने संपवलं
crime news : विवाहबाह्य संबंधातून नवऱ्याने आपल्या पत्नीची हत्या केली धक्कादायक घटना आहे. पत्नीने आपल्या नवऱ्याला विवाहबाह्य संबंधावरून जाब विचारला होता. याचाच नवऱ्याला राग आल्याने त्याने पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला करत संपवलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
काली माता मंदिराजवळ पत्नीवर चाकूने हल्ला
विवाहबाह्य संबंधावरून जाब विचारल्याने वाद
Crime News : देशात सध्या अनैतिक प्रेमसंबंधाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. विवाहबाह्य संबंधातून नवऱ्याने आपल्या पत्नीची हत्या केली धक्कादायक घटना आहे. पत्नीने आपल्या नवऱ्याला विवाहबाह्य संबंधावरून जाब विचारला होता. याचाच नवऱ्याला राग आल्याने त्याने पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला करत संपवलं. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही घटना राजधानी दिल्लीच्या द्वारका परिसरात घडली आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
हे ही वाचा : Astrology : करिअर, पैसा आणि नातेसंबंध... केतूचे मघा नक्षत्रातून भ्रमण, 'या' राशींना लाभ
काली माता मंदिराजवळ पत्नीवर चाकूने हल्ला
पोलिसांच्या माहितीनुसार, 27 सप्टेंबर रोजी दुपारी 4.49 वाजता, त्याला पालम येथील जे. जे. वसाहतीत काली माता मंदिराच्या जवळ चाकूने हल्ला झाल्याची माहिती देणारा पीसीआर कॉल आला होता. त्या महिलेची सोनिया (वय 30) अशी ओळख समोर आली. नंतर पीडितेला इंदिरा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
विवाहबाह्य संबंधावरून जाब विचारल्याने वाद
संबंधित प्रकरणात तपासादरम्यान पोलिसांना आढळून आले की, सोनियाने तिच्या पतीला कथितरित्या विवाहबाह्य संबंधाबाबत जाब विचारला होता. दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि प्रदीपने पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केला, या हल्ल्यात पीडितेच्या छातीसह मानेवर अनेक जखमा आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.
हे ही वाचा : भाडेकरु महिलेसोबत शरीरसंबंध अन् दोन भावांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट; नेमकं काय घडलं?
पोलिसांनी सांगितलं की, एका जोडप्याचा विवाह हा 2017 मध्ये झाला होता, त्यांना दोन मुले देखील होती. मिळालेल्या माहितीनुसार, विवाहबाह्य संबंधाच्या आरोप आणि संशयावरून त्यांच्यावर वारंवार वाद झाल्याने त्यांचे संबंध काही काळापासून ताणलेले होते. हल्ल्यात वापरलेले शस्त्र आणि घटनेचा संपूर्ण तपास पोलीस करत असल्याची माहिती समोर आली.
