जळगाव हादरलं! बस पकडण्यासाठी धावत गेलेल्या विद्यार्थिनीचा चिरडून मृत्यू

मुंबई तक

Jalgaon Crime News : जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पाळधी बस स्थानकावर धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बस पकडण्यासाठी धावत गेलेल्या विद्यार्थिनीचा बसच्या खाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

Jalgaon crime news
Jalgaon crime news
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

जळगाव हादरलं!

point

बस पकडण्यासाठी धावत गेलेल्या विद्यार्थिनीचा बसच्या खाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

Jalgaon Crime News : मनिष जोग - जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पाळधी बस स्थानकावर धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बस पकडण्यासाठी धावत गेलेल्या विद्यार्थिनीचा बसच्या खाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. मृत विद्यार्थिनीची राजनंदिनी शिंदे अशी ओळख समोर आलीय. या मन सुन्न करून टाकणाऱ्या घटनेनं पाळधी परिसरासह संपूर्ण जळघाव जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनं ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 

हे ही वाचा : बायकोचा दुसऱ्याच पुरुषावर जीव, दारूचे आमिष दाखवून नवऱ्याला जंगलात पुरलं

बस पकडताना बसखाली चिरडली विद्यार्थिनी

घडलेल्या घटनेनुसार, मृत विद्यार्थिनी राजनंदिनी शिंदे ही पाळधी येथील झंवर विद्यालयात शिक्षण घेत होती. नेहमीप्रमाणे ती कॉलेजवरून घरी जात असताना, बस पकडण्यासाठी गेली होती. मात्र, याचदरम्यान विद्यार्थ्यांच्या बसमध्ये बसण्यासाठी धावपळ उडाली. याच गोंधळात तिने बसमध्ये प्रवेश करताना तिचा पाय सटकला आणि ती थेट चालत्या बसच्या चाकाखाली आली. क्षणार्धातच होत्याचं नव्हतं झालं आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

विद्यार्थिनीच्या नातेवाईकांचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश 

या अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. राजनंदिनीचा मृतदेह उत्तरीय तापासणीसाठी जळगाव येथील एका शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला होता. रुग्णालयाच्या परिसरात मृत विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश केला होता. या घटनेनं आता एसटी महामंडळाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित होत आहे. 

हे ही वाचा : क्लायंटच्या फ्लॅटवर वाद, जिम ट्रेनरला बेदम मारहाण करत संपवलं

पाळधी मध्यवर्ती ठिकणी असल्याने शाळा आणि महाविद्यालये सुटण्याच्या वेळेतच बस स्थानकावर विद्यार्थ्यांची प्रचंड प्रमाणात गर्दी वाढली होती. मात्र अपुऱ्या बसमुळे विद्यार्थिनीने घरी लवकर जाण्याचा प्रयत्न केल्याने ही दुर्दैवी घटना घडली होती.