विमानात बसण्याआधी राहुल गांधींचं DMK ला साकडं, स्टॅलिन यांच्या रिप्लायची जोरदार चर्चा!

पृथ्वीराज पाटील

29 Nov 2026 (अपडेटेड: 29 Nov 2026, 12:42 PM)

डिलिमिटेशन विधेयकाला विरोध करावा अशी विनंती राहुल गांधी यांनी स्टॅलिन यांना केली आहे. मात्र आम्ही भूमिकेवर ठाम आहोत असं स्टॅलिन यांनी सांगितलं आहे.

Delimitation Bill Opposition

Delimitation Bill Opposition

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

मतदारसंघ पुनर्रचना विधेयक

point

राहुल गांधींची स्टॅलिन यांना साद

point

स्टॅलिन भूमिकेवर ठाम

Delimitation Bill Opposition : डिलिमिटेशन विधेयकावरून देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून, इंडिया आघाडीतील नेत्यांनी विरोधाची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, ममता बॅनर्जी यांच्यासह इंडिया आघाडीतील अनेक नेते डीएमके प्रमुख एम. के. स्टॅलिन यांच्या भेटीसाठी चेन्नईला रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे, या भेटीपूर्वीच राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत स्टॅलिन आणि डीएमकेला डिलिमिटेशन विधेयकाला विरोध करण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

हे वाचलं का?

राहुल गांधी काय म्हणाले?

राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत डिलिमिटेशन विधेयकाला विरोध करण्यासाठी स्टॅलिन यांच्याकडे पाठिंबा मागितला आहे. लोकसभेतील जागांची संख्या 850 पर्यंत वाढवल्यास देशातील लोकशाही धोक्यात येईल, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. या विधेयकामुळे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्यांच्या राजकीय फायद्यासाठी देशाचा संपूर्ण निवडणूक नकाशा नव्याने आखण्याची अमर्याद संधी मिळेल, असा आरोपही त्यांनी केला. स्टॅलिन यांनी यापूर्वीही तामिळनाडूच्या हितासाठी आणि संविधानाच्या संरक्षणासाठी ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे देशहित, तामिळनाडूचं हित आणि संविधानाच्या रक्षणासाठी हे विधेयक एकत्रितपणे पराभूत करणं गरजेचं असल्याचं राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हे ही वाचा : डिलिमिटेशनविरोधात सोनिया गांधी मैदानात, स्टॅलिन-पवारांना भेटणार; भाजपचं टेन्शन वाढणार?

स्टॅलिन भूमिकेवर ठाम

दरम्यान, राहुल गांधी यांच्या आवाहनाला एम. के. स्टॅलिन यांनी एक्सवरून उत्तर दिलं आहे. डीएमकेने संविधानाचं आणि राज्यांच्या अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी ऐतिहासिक भूमिका बजावल्याची दखल घेतल्याबद्दल त्यांनी राहुल गांधी यांचे आभार मानले आहेत. तामिळनाडू आणि तमिळ जनतेचं हित हेच डीएमकेसाठी नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिलं आहे. या भूमिकेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं स्टॅलिन यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच इतिहास आपल्याला कट्टाबोम्मन म्हणून लक्षात ठेवेल, एट्टप्पन म्हणून नाही, असा उल्लेख करत त्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचा संदेश दिला आहे.

हे ही वाचा : जेलच्या चार भिंतीआड महिला गार्डसोबत काय घडलं? नाईट ड्युटीवर असताना जेलरने बलात्कार केल्याचा आरोप!

पुढं काय?

स्टॅलिन यांच्या या प्रतिक्रियेमुळे डिलिमिटेशन विधेयकावर इंडिया आघाडीतील चर्चेला आणखी महत्त्व प्राप्त झालं आहे. एका बाजूला राहुल गांधी विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे स्टॅलिन यांनी तामिळनाडूच्या हिताशी तडजोड करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे चेन्नईत होणाऱ्या या बैठकीत डीएमकेची नेमकी भूमिका काय असेल आणि इंडिया आघाडी या विधेयकाविरोधात एकत्रित रणनीती तयार करू शकणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.