'कधी सीमा बनली, कधी स्वीटी तर कधी सरस्वती'; ब्राझीलच्या मॉडेलचं हरियाणात 22 वेळा मतदान', राहुल गांधींचा नवा बॉम्ब

Rahul Gandhi Press Conferance : 'कधी सीमा बनली, कधी स्वीटी तर कधी सरस्वती'; ब्राझीलच्या मॉडेलचं 22 वेळा मतदान', राहुल गांधींचा नवा बॉम्ब

Rahul Gandhi Press Conferance

Rahul Gandhi Press Conferance

मुंबई तक

05 Nov 2025 (अपडेटेड: 05 Nov 2025, 01:29 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

'कधी सीमा बनली, कधी स्वीटी तर कधी सरस्वती'

point

ब्राझीलच्या मॉडेलचं 22 वेळा मतदान', राहुल गांधींचा नवा बॉम्ब

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हरियाणातील विधानसभा निवडणुकीवरून भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला आहे. "ब्राझीलच्या मॉडेल हरियाणाच्या निवडणुकीत कधी सीमा, कधी स्वीटी तर कधी सरस्वती म्हणून 22 वेळा मतदान केलं आहे. याशिवाय तिने 10 वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर जाऊन मतदान केलं आहे", असा दावा दिल्लीतील पत्रकार परिषदेत सादरीकरण करताना राहुल गांधी यांनी केला आहे.

हे वाचलं का?

“ब्राझीलियन मुलगी मतदारयादीत कशी?”

राहुल यांनी पत्रकार परिषदेत एक ब्राझीलियन मुलीचा फोटो दाखवला आणि प्रश्न विचारला – “हरियाणाच्या मतदारयादीत हिचं काय काम आहे?” त्यांनी दावा केला की हरियाणातील पाच विभागांमध्ये तब्बल 25 लाख मते चोरीला गेली असून एका मतदारसंघात एका महिलेनं 100 वेळा मतदान केल्याची नोंद आहे. राहुल यांच्या या आरोपानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून काँग्रेसने निवडणूक आयोगाकडून या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी केली आहे.

राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले, “आमच्या उमेदवारांनी निवडणुकीदरम्यान काहीतरी संशयास्पद घडत असल्याचे सांगितले होते. एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला बहुमत मिळेल असे दाखवले गेले, मात्र निकाल उलट आले. पोस्टल मत आणि प्रत्यक्ष मतदानातील मोठी तफावत प्रथमच दिसली. आम्ही याचा तपास केला आणि समोर आलेले निष्कर्ष धक्कादायक होते. मी माझ्या टीमला वारंवार पडताळणी करण्यास सांगितले, आणि हे सर्व आम्ही आकडेवारीसह सिद्ध करू शकतो.” त्यांनी पुढे सांगितले की, ही बाब केवळ काँग्रेसपुरती मर्यादित नाही, तर देशातील तरुणांच्या मतांवर डाका टाकला जात आहे. “मी निवडणूक आयोगाला थेट प्रश्न विचारतो – या मतदान यंत्रणेमध्ये एवढ्या त्रुटी का आहेत?” असा सवालही राहुल गांधी यांनी केला आहे.

राहुल गांधींच्या सादरीकरणात हरियाणाच्या मतदार यादीतील मोठे विसंगती दाखवण्यात आल्या. एका महिलेचा फोटो एकाच वेळी अनेक मतदान केंद्रांच्या यादीत दिसतो, तर काही ठिकाणी मतदारांचे वय आणि फोटो जुळत नाहीत. राहुल म्हणाले, “एका महिलेला दोन मतदान केंद्रांवर 223 वेळा दाखवले गेले आहे. निवडणूक आयोगाने याचे उत्तर द्यावे की हे कसे शक्य आहे. म्हणूनच आयोग सीसीटीव्ही फुटेज जाहीर करत नाही.”

हरियाणामध्ये अशा हजारो बनावट नोंदी आहेत. अस्पष्ट फोटो वापरून मते चोरीला गेली आहेत. मतदार कोण आहे हे ओळखणेच अशक्य झाले आहे. आयोगाकडे डुप्लिकेट मतदार काढण्यासाठी सॉफ्टवेअर असूनही ते वापरले जात नाही. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची गरज नाही, काही सेकंदात हे शक्य आहे. पण आयोग भाजपच्या फायद्यासाठीच मौन बाळगतो आहे,” असे राहुल गांधींचे म्हणणे आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

शाळेतून घरी परतत असताना अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार! रस्त्याच्या कडेला पीडिता बेशुद्ध अवस्थेत अन्...

 

    follow whatsapp