Democrat Zohran Mamdani is New York City's 1st Indian-origin Muslim mayor : अमेरिकेच्या सर्वात मोठ्या आणि आर्थिक दृष्ट्या महत्त्वाच्या शहरात इतिहास घडलाय. जोहरान ममदानी यांनी न्यूयॉर्क महापौरपदाची निवडणूक जिंकली असून ते या पदावर विराजमान होणारे पहिले भारतीय वंशाचे मुस्लिम महापौर ठरले आहेत. कामगार वर्गाशी संबंध, प्रामाणिक व्यक्तिमत्त्व आणि तगडा प्रचार यामुळे न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या निवडणुकीत त्यांना यश मिळालंय. त्यांच्या या विजयामुळे अमेरिकन डेमोक्रॅटिक पक्षातील गटाला मोठे बळ मिळाले आहे. विशेष म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जोहरान यांच्यावर जोरदार टीका केली होती. मात्र, न्यूयॉर्कच्या नागरिकांनी त्यांनाच निवडून दिलं आहे.
ADVERTISEMENT
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती जहरी टीका
जोहरान ममदानी हे प्रख्यात चित्रपट दिग्दर्शिका मीरा नायर आणि विद्वान महमूद ममदानी यांचे पुत्र आहेत. दोघांचेही मूळ भारताशी संबंधित आहे. जोहरान लहानपणी न्यूयॉर्कला स्थलांतरित झाले आणि क्विन्स परिसरात वाढले. त्यांनी निवडणुकीत अन्नधान्य आणि मूलभूत सेवा परवडणाऱ्या दरात उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले. यासाठी श्रीमंत आणि मोठ्या कंपन्यांवर अधिक कर लावण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला, ज्यामुळे शहरातील अब्जाधीश वर्ग त्यांच्या विरोधात उभा राहिला. तरीही, तरुण, कामगार आणि स्थलांतरित मतदारवर्गाने त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला. त्यामुळे एका अपरिचित राज्य विधानसभेच्या सदस्यापासून ते थेट डेमोक्रॅटिक महापौरपदाच्या उमेदवारापर्यंत त्यांनी झेप घेतली. निवडणुकीपूर्व सर्वेक्षणांमध्ये ते मोठ्या फरकाने आघाडीवर होते आणि अखेरीस तीच आघाडी निकालात देखील पाहायला मिळाली.
हेही वाचा : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांची घोषणा, मतदान आणि मतमोजणी कधी? संपूर्ण माहिती एका क्लिकवर
दरम्यान, मोफत बालसंवर्धन, मोफत बससेवा आणि सरकारी किराणा दुकाने अशा त्यांच्या महत्वाकांक्षी योजनांसाठी निधी कसा उभारला जाणार?, यावर प्रश्नचिन्ह आहे.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, या निवडणुकीत दोन मिलियनहून (20 लाखांहून) अधिक न्यूयॉर्कवासीयांनी मतदान केले असून, 1969 नंतरच्या महापौर निवडणुकीतील सर्वाधिक मतदान अशी ही नोंद ठरली आहे. ममदानी यांच्या विजयाची घोषणा केल्यानंतर रिपब्लिकन उमेदवार कर्टिस स्लिवा यांनी पराभव मान्य केला आणि न्यूयॉर्कमध्येच राहून लढा सुरू ठेवण्याची प्रतिज्ञा केली. ते म्हणाले, “आम्ही नव्या महापौरावर लक्ष ठेवू, ते सर्व नागरिकांची सेवा करतील आणि समाजवाद भांडवलशाहीची जागा घेणार नाही, याची खात्री करू,”
प्रचार मोहिमेदरम्यान ममदानी यांच्यावर रिपब्लिकन पक्षाकडून, विशेषतः डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सातत्याने टीका करण्यात आली. ट्रम्प यांनी त्यांना “कम्युनिस्ट” म्हटले. इतकेच नव्हे, तर ते 2018 पासून अमेरिकेचे नागरिक असतानाही, ट्रम्प यांनी त्यांच्या पात्रतेवर प्रश्न उपस्थित केला होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Election Commission: 'दुबार मतदार आहेत..', निवडणूक आयोगाने मान्य केलं अन् शोधला '** डबल स्टार'चा भलताच फंडा
ADVERTISEMENT











