Election Commission: 'दुबार मतदार आहेत..', निवडणूक आयोगाने मान्य केलं अन् शोधला '** डबल स्टार'चा भलताच फंडा

निलेश झालटे

मतदार याद्यांमध्ये दुबार मतदार असल्याचं राज्य निवडणूक आयोगाने मान्य केलं आहे. मात्र, त्यावर पर्याय म्हणून एक वेगळा उपाय आणला असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

ADVERTISEMENT

election commission, double voters, election Commissioner, double star solution, Maharashtra election, raj thackeray, mns chief raj thackeray, raj thackeray furious, elections dates, nagar parishad elections, nagar panchayat elections,
Election Commission
social share
google news

मुंबई: मतदार याद्यांमधील दुबार नावे हटवून मगच निवडणुका घ्या, अशी मागणी विरोधी पक्षांनी लावून धरली आहे. आंदोलनं करत आणि पुराव्यांसह अक्षरक्षा रान पेटवलं आहे. अशात आता राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील 288 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी निवडणूक घोषित केली आहे.  2 डिसेंबर 2025 रोजी मतदान 3 डिसेंबर 2025 मतमोजणी होणार आहे. ही घोषणा करतानाच राज्य निवडणूक आयुक्तांनी दुबार मतदारांबाबत एक अजब उपाय हुडकून काढला आहे. 

पहिलं तर दुबार मतदार असल्याचं आयोगानं कबूल केलं आहे ही देखील मोठी गोष्ट आहे. यावरुनच आता अनेक सवाल उपस्थित केले जाऊ लागले आहेत. मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर डबलस्टार (**) असे चिन्ह नमूद करण्यात येणार आहे आणि बरीच प्रोसेस केल्यानंतर ओळख पटल्यानंतरच संबंधिताला एकाच मतदान केंद्रावर मतदान करण्याची मुभा देण्यात येणार आहे.

यावर निवडणूक आयुक्तांना केलेले सवाल आणि त्यांची राज ठाकरेंच्या भाषेत उडालेली भंबेरी आधी बघा.

दुबार मतदारांवर राज्य निवडणूक आयुक्तांचं उत्तर

'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर (**) असे चिन्ह नमूद करण्यात येते. असे मतदार कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत, याबाबत त्यांना आवाहन करण्यात येईल. या आवाहनाला प्रतिसाद मिळाल्यानंतर अशा मतदारांकडून तो कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहे, याबाबत विहित नमुन्यात अर्ज भरून घेतला जाईल. त्याने नमूद केलेले मतदान केंद्र वगळता त्यास उर्वरित कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही.' 

'परंतु प्रतिसाद न मिळाल्यास संभाव्य दुबार नाव असलेला मतदार मतदान केंद्रावर मतदानासाठी आल्यास त्याच्याकडून त्याने इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले नसल्याबाबत किंवा करणार नसल्याचे विहित नमुन्यातील हमीपत्र लिहून घेण्यात येईल. त्याचबरोबर त्याची काटेकोरपणे ओळख पटल्यानंतरच त्याला संबंधित मतदान केंद्रावर मतदान करण्याची मुभा देण्यात येईल.' असं उत्तर राज्य निवडणूक आयुक्तांनी दिलं आहे.

शहरी भागांमध्ये आणि त्यातही मोठ्या महापालिकांच्या शहरांमध्ये दुबार मतदारांची नोंदणी अधिक आहे. पालिकांची निवडणूक शेवटच्या टप्प्यात म्हणजे जानेवारीत होणार आहे. तोवर महापालिकांच्या शहरांमध्ये दुबार नावे हुडकून त्यांना दोन ठिकाणी मतदान करण्यापासून रोखणे शक्य होणार आहे. मात्र नगरपालिकांची निवडणूक आता सहा दिवसांवर आहे. तारखा लक्षात घ्या. निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास 10 नोव्हेंबर पासून सुरुवात होईल. नामनिर्देशपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर 2025 असेल. मतदान 2 डिसेंबर  रोजी होतंय. 

हे वाचलं का?

    follow whatsapp