पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांनंतर आता अजितदादांचे दुसरे पुत्रही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? कुठून लढणार?

Ajit Pawar son Jay Pawar : पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांनंतर आता अजितदादांचे दुसरे पुत्रही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? कुठून लढणार?

Ajit Pawar son Jay Pawar

Ajit Pawar son Jay Pawar

मुंबई तक

04 Nov 2025 (अपडेटेड: 04 Nov 2025, 01:49 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांनंतर आता अजितदादांचे दुसरे पुत्रही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?

point

अजित पवारांचे दुसरे चिरंजीव जय पवार निवडणूक लढणार असल्याची चर्चा

Ajit Pawar son Jay Pawar, Baramati  : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांच्या राजकारणातल्या एन्ट्रीची जोरदार चर्चा सुरू आहे. बारामती नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने नगराध्यक्ष पदासाठी जय पवार यांचे नाव चर्चेत आले आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारठकर यांनी देखील याबाबत दुजोरा दिला आहे. "जय पवार यांच्या नावाचा जनतेतून रेटा आहे. ते चांगल्या पद्धतीने काम करू शकतील असा विश्वास बारामतीकरांना वाटतोय. त्यामुळे त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्यांचं नाव नगराध्यक्षपदीसाठी जाहीर झाले तर त्यांनी राजकारणात एन्ट्री का घेऊ नये?" असं गारठकर म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

दरम्यान, यापूर्वी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि थोरले पुत्र पात्र पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. दोघांनाही निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, आता जय पवार नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढणार असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आजच घोषणा होणार? राज्य निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद

पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांना करावा लागला होता पराभवाचा सामना 

बारामती लोकसभा मतदारसंघातील 2024 ची निवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात लक्षवेधी लढत ठरली होती. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटातील सुनेत्रा पवार यांच्यात चुरशीची सामना झाला. पवार कुटुंबातील हा थेट सामना राज्यभर चर्चेचा विषय ठरला. अजित पवारांच्या बंडानंतर पवार कुटुंबात निर्माण झालेल्या राजकीय फाटाफुटीचा निकाल या निवडणुकीत दिसून आला. दोन्ही बाजूंनी ताकदीनं प्रचार करण्यात आला, तर बारामतीतील प्रत्येक गावात भावनिक आणि प्रतिष्ठेची लढत रंगली. शेवटी सुप्रिया सुळे यांनी अनुभवी राजकारणी म्हणून जनतेचा विश्वास संपादन करत विजय मिळवला, तर सुनेत्रा पवार यांनी पराभव पत्करला या निकालानं बारामतीत पवार कुटुंबातील अंतर्गत संघर्षाची झलक दिसली, तसेच मतदारांनी परंपरागत शरद पवारांच्या विचारांना पाठिंबा दिला, असा संदेश या निवडणुकीतून गेला.

अजित पवार यांचे थोरले चिरंजीव पार्थ पवार यांनी मावळमधून 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, यानिवडणुकीत त्यांचा शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी दारुण पराभव केला होता. त्या वेळी भाजप-शिवसेना महायुती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी यांच्यात थेट सामना झाला होता. श्रीरंग बारणे यांनी 2014 मध्येही याच मतदारसंघातून विजय मिळवला होता, त्यामुळे त्यांच्याकडे संघटनशक्ती आणि जनसंपर्काचा मजबूत पाया होता. पार्थ पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. मात्र, मात्र जनतेने पुन्हा बारणे यांच्यावर विश्वास दाखवला होता.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

असीम सरोदेंची सनद 3 महिन्यांसाठी रद्द झाल्यानंतर उद्धव ठाकरे संतापले, भगतसिंग कोश्यारींचं नाव न घेता म्हणाले...

    follow whatsapp