असीम सरोदेंची सनद 3 महिन्यांसाठी रद्द झाल्यानंतर उद्धव ठाकरे संतापले, भगतसिंग कोश्यारींचं नाव न घेता म्हणाले...
Uddhav Thackeray on Asim Sarode charter : असीम सरोदेंची सनद 3 महिन्यांसाठी रद्द झाल्यानंतर उद्धव ठाकरे संतापले, भगतसिंग कोश्यारींचं नाव न घेता म्हणाले...
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
असीम सरोदेंची सनद 3 महिन्यांसाठी रद्द झाल्यानंतर उद्धव ठाकरे संतापले
भगतसिंग कोश्यारींचं नाव न घेता उद्धव ठाकरेंची टीका
Uddhav Thackeray on Asim Sarode charter : बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांनी प्रख्यात विधिज्ञ अॅडव्होकेट असीम सरोदे यांच्या वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारच्या बैठकीत हा निर्णय अधिकृतपणे घेण्यात आला. असीम सरोदे यांनी सार्वजनिक कार्यक्रमात आणि सोशल मीडियावर न्यायव्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, याबाबत आता शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “ असीमजी, आम्ही सर्व स्वातंत्र्यप्रेमी तुमच्या सोबत आहोत,” अशी भूमिका ठाकरेंनी माडंलीये. शिवाय त्यांनी माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर नाव न घेता टीका केलीये.
उद्धव ठाकरे काय काय म्हणाले?
उद्धव ठाकरे म्हणाले, “आज देशात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, सरकारविरोधात आवाज उठवतो तो देशद्रोही ठरतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा जोतीराव फुलेंचा अपमान केला तरी त्याला माफी मिळणार? त्याच्या कारभाराबद्दल सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे मारले तरी काही बोलायचे नाही. मात्र त्यांनी केलेल्या अन्यायाबद्दल बोलणे आणि सत्य सांगणे म्हणजे मोठे पाप आहे, असे मानणे म्हणजे लोकशाहीची अवहेलना करणे आहे. थोडक्यात याबाबत गप्प राहा आणि आमची गुलामगिरी करा, ह्या कटाचाच हा एक भाग आहे. या देशात आता सत्यासाठी संघर्षच करावा लागणार आहे. आम्ही सर्व स्वातंत्र्यप्रेमी असीमजी तुमच्या सोबत आहोत, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली आहे.
हेही वाचा : हातावर मेहंदी लावून आल्याने वर्गात बसू देण्यास नकार, मुंबईतील शाळेला शिक्षण विभागाची नोटीस, मनसे आक्रमक
दरम्यान, या प्रकरणावर स्वतः असीम सरोदे यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “गेल्या 25 वर्षांपासून मी अन्यायग्रस्तांसाठी लढतो आहे. लोकांच्या न्यायहक्कांसाठी विविध क्षेत्रात काम केलं आहे. न्यायव्यवस्थेचा सन्मान वाढावा आणि तिच्यावर लोकांचा विश्वास टिकून राहावा, यासाठीच माझे प्रयत्न असतात. मी राज्यपालांविषयी ‘फालतू’ हा शब्द वापरल्याने माझ्यावर मिसकंडक्टचा आरोप ठेवण्यात आला आहे. पण जर माझ्या शब्दांनी कोणाला दुखावलं असेल, तर मी सर्वसामान्य नागरिकांची माफी मागतो.”










