Raj-Uddhav: ठाकरे बंधू महाराष्ट्रात इतिहास घडवतील?, ‘ही’ चर्चा अन्…

मुंबई तक

• 01:55 PM • 27 Jul 2023

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतील का? अशी चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. हे दोन्ही भाऊ एकत्र आल्यास राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे बदलून जाईल. जाणून घ्या याचविषयी सविस्तर.

raj thackeray and uddhav thackeray come together two brothers maharashtra political atmosphere mns shiv sena mumbai latest update on maharashtra politics

raj thackeray and uddhav thackeray come together two brothers maharashtra political atmosphere mns shiv sena mumbai latest update on maharashtra politics

follow google news

Maharashtra Politics Update: माधवी देसाई, मुंबई: राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन आक्रमक बंधू पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. यावेळी निमित्त ठरलंय उद्धव ठाकरेंची मुलाखत. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत जाण्याबाबत पहिल्यांदाच थेट भाष्य केलंय. या निमित्तानं हे दोन बंधू एकत्र येणारच नाहीत का? त्यांच्या एकत्र येण्याची शक्यता किती? दोन बंधू एकत्र आलेच तर काय होईल याच गोष्टींचा आढावा घेऊयात. (raj thackeray and uddhav thackeray come together two brothers maharashtra political atmosphere mns shiv sena mumbai latest update on maharashtra politics)

हे वाचलं का?

अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडून सत्तेत हातमिळवणी केली आणि मोठा राजकीय भूकंप झाला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेना भवनबाहेर एक बॅनर झळकला. राजसाहेब उद्धवसाहेब आता तरी एकत्र या अशा आशयाचा हा बॅनर होता. त्यानंतर ठाण्यातही असे बॅनर झळकले. 4 जुलैला मनसे नेत्यांची एक बैठक शिवतीर्थवर पार पडली. या बैठकीत नेत्यांनीही राज ठाकरेंकडे दोन्ही बंधूंनी एकत्र यावं अशी मागणी केली. राज ठाकरेंनी या चर्चांवर थेट भाष्य करणं टाळलं. मात्र, या बैठकीनंतर जवळपास 20-22 दिवस उलटले आणि उद्धव ठाकरे आता या चर्चांवर व्यक्त झाले.

हे ही वाचा >> ‘मार्शल बोलवून बाहेर काढावं लागेल’, गोपीचंद पडळकरांना नीलम गोऱ्हेंनी झापलं

उद्धव ठाकरेंनी या चर्चा स्पष्टपणे फेटाळून लावल्या. मात्र, त्यांनी भविष्यात राज ठाकरेंशी युतीची शक्यता मावळली, किंवा कधीच राज ठाकरेंशी युती करणार नाही अशा प्रकारचं विधान केलेलं नाही. सध्या राज्यात होणाऱ्या अजब युती- आघाडी पाहता राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे, गेले 18 वर्ष वेगळी चूल मांडलेले राज ठाकरे पुन्हा भावासोबत येऊ शकतात.

आता उद्धव-राज यांच्या एकत्र येण्याची चर्चा आत्ताच का रंगली हे आपण पाहूया..

1) राज्यात बदललेली राजकीय समीकरणं- शिवसेनेतील फुटीला आता एक वर्ष उलटलं आहे. अजित पवारांच्या फुटीनंतर विरोधी पक्षांच्या आक्रमणाची धार कमी झाली आहे. ही स्पेस भरुन काढण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात.

2) शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची स्थिती- मनसेला स्थापनेनंतर जवळपास 18 वर्ष होऊनही अपेक्षित यश मिळालेलं नाही. सध्या राज्यात त्यांचा एकमेव आमदार आहे. दुसरीकडे बंडानंतर शिवसेनेची ताकदही कमी झाली आहे. अशा परिस्थितीत दोघं एकत्र आल्यास दोघांनाही याचा फायदा होऊ शकेल.

हे ही वाचा >> ‘अजित पवार आज ना उद्या मुख्यमंत्री होतील’, प्रफुल पटेलांचं विधान

3) आगामी निवडणुकांचं गणित- भाजपला अजित पवारांच्या रुपात नवा गडी मिळाला आहे. शिंदे त्यांच्यासोबत आहेतच. अशा परिस्थितीत आगामी निवडणुकांत मनसेला सोबत घेण्याबाबत भाजप साशंक दिसतंय. अमित ठाकरेंवरुन भाजप- मनसेचा नुकताच झालेला संघर्षही आपण पाहिला आहे. अशा परिस्थितीत मनसेसमोर शिवसेना ठाकरे गटाचा पर्याय असू शकतो.

या कारणांमुळे उद्धव ठाकरे-राज ठाकरे भविष्यात एकत्र येतील असं आपण गृहित धरुयात. मात्र, हे बंधू एकत्र आल्यास काय होईल याचाही विचार करुयात.

1) मराठी मतांचं विभाजन न होता दोघांना एकगठ्ठा मतं मिळतील
2) दोन्ही पक्षांना नवी उभारी मिळेल
3) आगामी निवडणुकांत दोघांनाही फायदा होईल
4) दोघांचे नेतृत्वगुण, आक्रमकपणा, वक्तृत्व याचाही एकत्रित फायदा होईल
5) महायुतीविरोधात आक्रमणाची धार वाढेल

अर्थात हे दोन्ही भाऊ एकत्र आल्यास तो खूप मोठा राजकीय चमत्कार असेल. या दोन्ही बंधूंमध्ये वैयक्तिक पातळीवर संघर्ष असला तरी कौटुंबिक पातळीवर जेव्हा आनंद किंवा दु:खाचा प्रसंग येतो तेव्हा हे भाऊ एकमेकांच्या भेटीला जातात. अमित ठाकरेंच्या लग्नाला उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब उपस्थिती लावली होती. तसंच, उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला राज ठाकरे उपस्थित होते. मात्र, हे मनभेद विसरुन हे बंधू पक्षाच्या हितासाठी एकत्र येणार का हे येणारा काळच ठरवेल.

    follow whatsapp