Raj Thackeray on Narendra Modi, मुंबई : "पीएम मोदी म्हणाले, मला विद्यार्थ्यांनी शिव्या दिल्या आणि माझ्या आईलाही शिव्या दिल्या.. हे चुकीचचं आहे. पण मला मोदींना सांगायचं आहे की, दुसऱ्यांनाही आई असते. हे तुम्ही तुमच्या पक्षातील लोकांना सांगा. तुमच्या ट्रोल टीमकडून कोणत्या भाषेत ट्रोल केले जाते ते पाहा. मोदी सांगतात, मुलांना माफ केलं. जंतरमंतरवरच्या विद्यार्थ्यांची डोकं फोडली. नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी पेपर फुटीमुळे आत्महत्या केली त्यांची माफी कोण मागणार आहे?" असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. ते विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनानिमित्ताने केलेल्या भाषणात बोलत होते.
ADVERTISEMENT
हेही वाचा : 'सॉरी आई, मी निघून जातीये...' लग्नानंतर सातच महिन्यात शिक्षिकेने संपवलं जीवन, धक्कादायक कारण समोर
भाजपने जे पेरलं तेचं उगवलं - राज ठाकरे
या वेळी राज ठाकरे म्हणाले, पंतप्रधानांचा व्हिडीओ पाहिलाय. ते म्हणाले, ज्या प्रकारची भाषा वापरली गेली, ती अयोग्य आहे. मला हे 100 टक्के मान्य आहे. पण मला पंतप्रधानांना सांगायचं आहे, हे तुमच्या पक्षातील लोकांना देखील सांगा.. तुमची ट्रोल करणारी टीम कोणत्या भाषेत बोलते..ते पाहा.. महाराष्ट्रातील अनेक कलाकार म्हणतात. बोलायला नको. काही करायलाच नको, कारण ट्रोल केलं जातं. त्याही लोकांना पंतप्रधांनी सांगावं हे बंद करावं. भाजपच्या ट्रोलच्या टीममुळेच हे सुरु झालं. जे पेरलं तेचं उगवलं आहे.
हेही वाचा : अभिजीत दिपकेंचा जेनझी बद्दलचा विचार काय? मुलाखतीत सगळे खळखळून हसले...
'शिक्षण संस्थांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृह नाहीत, 10 लाख शिक्षकांची गरज आहे'
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, आजची देशाची शिक्षणाची परिस्थिती काय आहे? 1 लाख शिक्षण संस्थांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृह नाहीत. 10 लाख शिक्षकांची गरज आहे. 2014 मध्ये 3 लाख विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी गेले होते. आता ती संख्या 9 लाखांवर पोहोचली आहे. मुलं परदेशात जातात, कारण सभोवतालचे वातावरण आहे. आज कित्येक चित्रकार , खेळाडू आहेत, त्यांना वाव नाही. कोणाला भेटायचं, काय करायचे हे माहिती नाही. हे सगळं साचलेलं बाहेर येत आहेत. नीटचे पेपर फुटण्याचा राग आहेच..पण बाकीचं साचून ठेवलेलं आहे. त्याचा काय करणार आहात?
आज विद्यार्थी सेनेचा वर्धापन दिन आहे. माझी राजकारणाची सुरुवाती येथूनच झाली. त्यातून काम करत मी घडत गेलो आणि इथपर्यंत आलो. अमित आणि त्याचे सहकारी उत्तम काम करतील, अशी आशा आहे. सदस्य नोंदणीलाही प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षाही राज ठाकरेंनी व्यक्त केली.
ADVERTISEMENT












