मोदींचं कौतुक करणारे विवेक ओबेरॉय अन् आर माधवन राहायला दुबईत, राज ठाकरेंनी सगळंच काढलं

मुंबई तक

01 Aug 2026 (अपडेटेड: 01 Aug 2026, 01:45 PM)

Raj Thackeray on Vivek Oberoi and R. Madhavan : "पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सिनेमे बनवणारे आणि त्यांचं कौतुक करणारे कलाकार दुबईत राहातात. भारतात येऊन सरकारचे स्पॉन्सर्ड सिनेमे करतात", असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray on Vivek Oberoi and R. Madhavan

Raj Thackeray on Vivek Oberoi and R. Madhavan

Google CTA

बातम्या हायलाइट

point

'मोदींचं कौतुक करणारे विवेक ओबेरॉय अन् आर माधवन राहायला दुबईत'

point

राज ठाकरेंनी सगळंच काढलं

Raj Thackeray on Vivek Oberoi and R. Madhavan, मुंबई : "नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात हजारो उद्योगपती परदेशात निघून गेले. ज्यांनी मोदींवर चित्रपट काढला होता, तो विवेक ओबेरॉय दुबईमध्ये राहायला गेला. तो भारतात राहात नाही. मोदींनी देशासाठी चांगलं काम केलंय म्हणातो तो आर माधवन दुबईमध्ये स्थायिक झालेला आहे. त्यांना जर देशाबद्दल आणि पंतप्रधानांबद्दल प्रेम आहे तर परदेशात का राहात आहेत? इथं येऊन सरकारने स्पॉन्सर्ड केलेले सिनेमे करतात आणि दुबईला राहातात", असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. मुंबईत मनसेने विद्यार्थी सेनेचा वर्धापनदिन साजरा केला. यावेळी राज ठाकरे बोलत होते.

हे वाचलं का?

हेही वाचा : "दुसऱ्यांनाही आई असते, हे तुमच्या पक्षातील लोकांना...", राज ठाकरेंचं पीएम मोदींना प्रत्युत्तर

जेन झी मुलांना काय हवंय हे समजून घेणं गरजेचं- राज ठाकरे 

राज ठाकरे म्हणाले, एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर लगेच विद्यार्थी सेनेचा वर्धापन दिन आला. मी कामाला सुरुवात केली, तेव्हा काळ वेगळा होता. त्यावेळी तरुण वेगळा होता. आताचा वेगळा आहे. त्यावेळी विद्यार्थी वेगळे होते, आताचे वेगळे आहेत. आम्ही टेलिग्रामपासून इन्स्टाग्रामपर्यंतचा काळ पाहिला. आताचे जेन झी 1997 ते 2012 च्या दरम्यान जन्मलेले मुलं आहेत. या मुलांचं म्हणणं काय आहे.  इंग्रजी बोलणारी मुलं फक्त जे झी नसतात. ग्रामीण भागात पण ही मुलं आहेत. मुंबई-पुण्याचे आणि दिल्लीचेच फक्त जेन झी नाहीत. त्यांना काय हवंय हे समजून घेणं गरजेचं आहे. 

हेही वाचा : 'सॉरी आई, मी निघून जातीये...' लग्नानंतर सातच महिन्यात शिक्षिकेने संपवलं जीवन, धक्कादायक कारण समोर

मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट पाहायचेत  - राज ठाकरे 

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, आमच्या काळात लहान असताना झोपताना तेल लावत जा, बुद्धी येते. एका माणसाने आयुष्यभर डोक्याला तेल चोपडलं पण बुद्धी आली नाही. आणि म्हणे शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री.. दगडावरच्या फुटप्रिंट म्हणाले..त्यांना फिंगरप्रिंट म्हणायचं होतं. ते आधारशी लिंक करणार कसे? मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट पाहायचे आहेत. त्यांना कोल्हापूरच्या लोकांनी पुण्यात पाठवलं. कारण पुणे शिक्षणाचे माहेर घर आहे. पण तिथेही काय झालं नाही. असे मंत्री असतील तर जेन झी भडकरणारच... 

विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा का मिळाला? लोकं रस्त्यावर का आले? त्याला सभोवतालचे वातावरण आहे. इतक्या वर्षांचं साचलेलं आहे. मला फुटपाथवर चालता येत नाही. आमच्या भागात बाग नाही. शिक्षण झालंय. नोकरी नाही. कंपन्या खासगी लोकांना दिल्या जात आहेत. एकाच उद्योगपतीला जागा दिल्या जातात. जंगल दिले जात आहेत. आमदारांना विकत घेताना पैसे कुठून येतात. हे सगळं लोकांच्या मनात साचलंय. त्याचा उद्रेक बाहेर येतोय. तो अजून येणार आहे. कोणाला सत्तेतून खेचणं आणि आणणे एवढ्यापुरता हा विषय नाही. हा देशातील तरुणांच्या भविष्याचा विषय आहे. ग्रामीण भागात तरुण-तरुणी दिवसभर काय करत असतील? बाजूच्या घरातील वडिलांच्या मित्राने आत्महत्या केली. विचार काय करणार? वडिलांच्या मनात हे येऊ नये. यासाठी शहरात गेलं पाहिजे. मला नोकरी कशी मिळणार? माझं काय होणार? सरकार स्मार्ट सिटी करणार म्हणालं होतं. कुठे आहेत स्मार्ट सिटी? शहरातील राहाणाऱ्या लोकांना त्रास होतोय तर ग्रामीण भागातील लोकं येऊन कसे राहाणार आहेत? असे सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केले.