'येत्या निवडणुकीत दिसल्यास फोडून काढा', लाखो दुबार मतदारांचे थेट पुरावे.. राज ठाकरेंनी दिला आदेश!

राज ठाकरेंचा धमाका, लोकसभेच्या 11 मतदारसंघातील दुबार मतदारांच्या याद्या आणल्या, पुन्हा आले ठोकून काढण्याचं आवाहन

Raj Thackeray showed evidence satyacha morcha Lakhs of double voters in 11 Lok Sabha constituencies 4.5 thousand in Malabar Hill marathi news

राज ठाकरे

मुंबई तक

01 Nov 2025 (अपडेटेड: 01 Nov 2025, 04:12 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

11 लोकसभा मतदारसंघात लाखो दुबार मतदार

point

येत्या निवडणुकीत दिसल्यास फोडून काढा, राज ठाकरेंचं आवाहन

Raj Thackeray showed evidence satyacha morcha : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील सत्याच्या मोर्चात दुबार मतदारांची यादीच समोर आणली आहे. यावेळी राज ठाकरेंनी 11 लोकसभा मतदारसंघातील दुबार आणि बोगस मतदारांच्या याद्या समोर आणल्या आहेत. यावेळी मतदार याद्यांचा डोंगरच राज ठाकरेंनी समोर आणून दाखवलाय. यावेळी त्यांनी 11 लोकसभा मतदारसंघात किती मतदार आहेत? त्यातील बोगस किती आहेत? याचा आकडा वाचून दाखवलाय.

हे वाचलं का?

राज ठाकरेंनी दुबार मतदारांची संख्या खालीलप्रमाणे

साडेचार मतदार कल्याण, भिवंडी आणि मुरबाडमधील आहेत. त्यांनी मलबार हिल मतदारसंघात मतदान केलं आहे. या साडेचार हजार मतदारांनी दोन्हीकडे मतदान केलं आहे. असे लाखो लोकं आहेत, जे या मतदानासाठी वापरले गेले. आता आणखी एक गोष्ट दाखवतो. या सर्वांचे पुरावे देतो. 1 जुलैला मतदार यादी बंद केली. त्यावेळपर्यंतची यादी दाखवतो.

मुंबई लोकसभा मतदारसंघ.. मी तुम्हाला जुलैपर्यंतची यादी वाचून दाखवतो. 1 जुलैला त्यांनी यादी बंद केली. तेव्हापर्यंतची यादी मी वाचून दाखवतोय.

  1. यामध्ये मुंबई उत्तर.. तिथे एका लोकसभा मतदारसंघात 17 लाख 29 हजार 456 मतदार आहेत. याच्यापैकी 62370 हे दुबार आहेत.
  2. मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार हे 16 लाख 74 हजार 861 आहेत.यामध्ये दुबार मतदार हे 60231 आहेत.
  3. मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार हे 15 लाख 90 हजार 710 आहेत.यामध्ये दुबार मतदार हे 92983 आहेत.
  4. मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार हे 16 लाख 81 हजार 048 आहेत.यामध्ये दुबार मतदार हे 63743 आहेत.
  5. मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार हे 14 लाख 37 हजार 776 आहेत.यामध्ये दुबार मतदार हे 50565 आहेत.
  6. मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार हे 15 लाख 15 हजार 993 आहेत.यामध्ये दुबार मतदार हे 55205 आहेत.
  7. नाशिक लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार हे 19 लाख 34 हजार 349 आहेत.यामध्ये दुबार मतदार हे 99673 आहेत.
  8. मावळ लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार हे 19 लाख 85 हजार 172 आहेत.यामध्ये दुबार मतदार हे 145636 आहेत.
  9. पुणे लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार हे 17 लाख 12 हजार 242 आहेत.यामध्ये दुबार मतदार हे 102002 आहेत.
  10. ठाणे लोकसभा मतदारसंघा दुबार मतदार हे 209981 आहेत.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, मी वोटिंग मशीनबद्दल देखील बोललो. त्यामध्ये गोंधळ असल्याचं सांगितलं. 232 आमदार निवडून आल्यानंतर लोक आश्चर्य व्यक्त करत होते. निवडून आलेले लोक स्वत:ला चिमटे काढून पाहात होते. निवडणूक आयोगामार्फत हे सुरु आहे. हा मतादारांचा अपमान आहे. मॅच अगोदरच फिक्स आहे. आज जी कायदेशीर प्रोसेस सुरु आहे. एक गोष्ट सांगतो निवडणुका होतील, त्यावेळी याद्यांवर काम करा. दुबार मतदार आले तर तिथेच फोडून काढायचे. बडवायचे आणि पोलिसांच्या ताब्यात द्यायचे. आजचा मोर्चा राग आणि ताकद दाखवण्याचा मोर्चा आहे. दिल्लीपर्यंत आवाज नेण्याचा मोर्चा आहे. या विषयात माझ्यासकट सर्वांनी भाष्य केलेलं आहे. तोच विषय नव्याने सांगण्यासारखा नाही. सर्वप्रथम तुम्ही ताकदीने इथे जमलात सर्वांचे आभार मानतो. हा फार मोठा विषय नाही. आम्ही बोलत आहोत. उद्धव ठाकरे, शरद पवार बोलत आहेत की, मतदारयादीत दुबार मतदार आहेत. काँग्रेस आणि कम्युनिष्ट पक्षाचेही लोक बोलत आहेत. शिंदे-भाजप आणि अजित पवारांचे लोकंही म्हणत आहेत, दुबार मतदार आहेत. मग निवडणुकीची घाई कशासाठी? पहिल्यांदा मतदार याद्या पारदर्शक करा. त्यानंतर निवडणुकीत जे होईल ते मान्य आहे. मात्र, लपूनछपून काय सुरु आहे?

बाळासाहेब थोरात म्हणाले, आपल्या देशाची लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय येथे आलाय. हा मोर्चा केंद्रीय आणि राज्याच्या निवडणूक आयोगाविरोधात आहे. राहुलजी गांधी यांनी दाखवून दिलं की, देशाच्या निवडणुका वोटचोरीतून होत आहेत. निवडणूक आयोग थातूर-मातूर उत्तर देत आहे. विधानसभा निवडणुकीत जी मतदारयादी वापरली ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वापरु नका, असं आवाहन आम्ही निवडणूक आयोगाला केली आहे. आम्ही त्यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटलो. आयोग आम्हाला उत्तर देत नाही. माझ्या संगमनेर मतदारसंघात साडेनऊ हजार मतदान बोगस आहे. ते ग्रामीण आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदारयादीत प्रचंड घोळ आहे. ही मतदारयादी दुरुस्त झाली पाहिजे. सत्ताधाऱ्यांनी मुकमोर्चा काढलाय. त्यामुळे निवडणूक आयोग सामील झालाय का? असा प्रश्न पडलाय.

    follow whatsapp