ADVERTISEMENT
Ajit Pawar on Maharashtra Farmer loan waiver, Pune : "शून्य टक्के व्याजाने पैसे दिल्यानंतर तुम्ही वेळच्या वेळी कर्ज फेडण्याची सवय लावून घ्यायला हवी. सारखेच फुकटात आणि सारखेच माफ करा म्हटल्यावर कसे व्हायचे? असे चालत नाही. एकदा साहेबांनी (शरद पवार) कर्जमाफी दिली, एकदा देवेंद्रजींनी दिली तसेच मी उद्धवजींच्या सरकारमध्ये असताना एकदा दिली. आता पुन्हा आम्हाला निवडून यायचे होते म्हणून आम्ही सांगितले आम्ही माफ करू, आम्ही माफ करू", असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. ते इंदापूरमध्ये बोलत होते. अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे महायुती सरकारने कर्जमाफीचे आश्वासन देऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची फसवणूक केलीये का? असा सवाल उपस्थित होतोय.
सारखीच मदत दिली जाणार नाही- अजित पवार
शेतकऱ्यांच्या मदतीबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, “शक्य तेथे आम्ही तुम्हाला जिल्हा बँक, डीपीडीसी, जिल्हा परिषद आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मदत करू. मात्र, सतत या प्रकारची मदत दिली जाणार नाही. शेतकऱ्यांनी स्वतःही पुढाकार घेणे गरजेचे आहे, शेतकऱ्यांनीही हातपाय हलवले पाहिजेत. हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.”
हेही वाचा : Encounter झालेल्या रोहित आर्याच्या मनात होती 'ती' गोष्ट, मराठी अभिनेत्रीच्या WhatsApp चॅटने उडवली खळबळ
“शेतकरी भीक मागत नाहीत”, राजू शेट्टींची अजितदादांवर टीका
अजित पवार यांच्या या वक्तव्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. माध्यमांशी बोलताना शेट्टी म्हणाले, “शेतकरी भिक मागत नाहीत. अजित पवार यांचे म्हणणे काही अंशी योग्य असले तरी सरकारने प्रथम ठोस व्यवस्था करायला हवी. राज्यातील कोणत्याही शेतकऱ्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी दरात माल विकावा लागू नये, अशी धोरणे आखली पाहिजेत. आम्ही वारंवार कर्जमाफी मागण्यासाठी भिकारी नाही,” असे शेट्टी यांनी ठामपणे सांगितले.
दरम्यान, अजित पवार पुढे बोलताना म्हणाले, शेतकऱ्यांच्या मेहनतीला न्याय मिळवून देण्यासाठी आणि ऊस उत्पादकांना वेळेवर देयक मिळावे यासाठी नवनवीन उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्या दृष्टिकोनातून कारखान्यांनी सुद्धा आपला कारभार नियोजनबद्ध ठेवण्याच्या सूचना केल्या. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे. आपल्या शेत कामात आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक अवलंब शेतकरी बांधवांनी करावा, असं आवाहन केलं. ऊस उद्योगाशी संबंधित सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
जरांगेचा डावच उलथवला, तर बच्चू कडूंच्या आडून फडणवीसांनी 'असे' मारले एका दगडात 5 पक्षी?
ADVERTISEMENT











