Narendra Modi Tweet : ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची प्रकृती बिघडल्याने ते पुढील दोन महिने सामाजिक जीवनापासून दूर राहणार असल्याची माहिती त्यांनी 'x' वर पोस्ट करत दिली. त्यांच्या या पोस्टमुळे एकच खळबळ उडाली आहे. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता तोंडावर आलेल्या आहेत. अशातच संजय राऊतांची प्रकृती अगदीच चिंताजनक असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला ते लवकर बरे व्हावेत अशा अनेकांनी पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केला आहेत. अशातच आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'X' ट्विट करत संजय राऊत लवकरच बरे व्हा अशा आशयाचे ट्विट केले आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 'ज्याला पलटन वाढवायची असेल, वाढवा बाबा...' आंबे खाऊन पोरं होत नाहीत... अजित पवारांचं लोकसंख्या नियंत्रणावर भाष्य
संजय राऊतांचं ट्विट जसंच्या तसं
सर्व मित्र परिवार आणि कार्यकर्त्यांसाठी नम्र विनंतीजय महाराष्ट्र ! आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेमही केले. पण सध्या अचानकरणे माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले. उपचार सुरु आहेत, मी यातून लवकर बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसाल मला बाहेरण जाणे व गर्दी मिसळणे यावर निर्बंध घालण्याच आले आहेत. त्याला लाईलाज आहे. मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन. आपले प्रेम आणि आशीर्वीद असेच राहू द्या, असे लिहून त्यांनी आपल्या 'X' ट्विटद्वारे माहिती दिली आहे. अशातच आता संजय राऊत यांच्या प्रकृतीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'X' ट्विटवर पोस्ट केली आहे.
राऊतांच्या प्रकृतीवर नरेंद्र मोदींचं ट्विट
नरेंद्र मोदींनी संजय राऊतांच्या प्रकृतीची चिंता व्यक्त करत 'X' ट्विट केले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये 'संजय राऊत जी, तुमच्या प्रकृतीत लवकर सुधारणा आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो', असे ट्विट केले आहे.
सुषमा अंधारे यांची संजय राऊतांसाठी पोस्ट
तसेच दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील सोशल मीडियावर संजय राऊतांसाठी पोस्ट लिहिली आहे, ती पुढील प्रमाणे जशीच्या तशी...
'मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा लवकर बरे व्हा.. आम्हाला कल्पना आहे की सार्वजनिक रित्या जरी आपण मिसळू शकणार नसलात तरी सुद्धा इथल्या पाताळयंत्री अजस्त्र महाकाय शक्ती विरोधात जी लढाई आपण उभी केलेली आहे ; त्या लढाईला वैचारिक रसद या दोन महिन्यात सुद्धा आपण पुरवत राहणार आहात... सन्माननीय पक्षप्रमुखांवर चौफेर हल्ले होत असताना छातीचा कोट करून आपण हा शिवसेनेचा गड वाचवण्यासाठी उभे राहिलात... खऱ्या अर्थाने मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा म्हणजे नेमकं काय हे आपल्याकडे बघितल्यावर महाराष्ट्राला कळतं... आपण ठणठणीत बरे होणार आहात.. आपल्यासोबत फक्त महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांचेच नाही तर इथला प्रत्येकदबलेला पिचलेला आणि भाजपच्या दंडेलशाहीने मेटाकुटीस आलेला प्रत्येक माणूस आपल्यासारख्या लढाऊ शिलेदारासाठी ठामपणे उभा आहे या सगळ्यांचे आशीर्वादआपल्या सोबत आहेत..आपल्याला उदंड आयुष्य लाभो..! आम्ही सगळे आपली वाट बघत आहोत..', अशी पोस्ट करत त्यांनी आपल्या भावना शब्दांत मांडल्या.
ADVERTISEMENT


 होम
होम राजकीय आखाडा
राजकीय आखाडा गुन्ह्यांची दुनिया
गुन्ह्यांची दुनिया शहर-खबरबात
शहर-खबरबात राशीभविष्य-धर्म
राशीभविष्य-धर्म पैशाची बात
पैशाची बात फोटो बाल्कनी
फोटो बाल्कनी हवामानाचा अंदाज
हवामानाचा अंदाज टॉपिक
टॉपिक

 
 









