बोगस आणि दुबार मतदारांचे सगळे पुरावे घेऊन आम्ही न्यायालयात जाणार, 'सत्याच्या मोर्चा'त उद्धव ठाकरे कडाडले

Uddhav Thackeray at satyacha morcha : बोगस आणि दुबार मतदारांचे सगळे पुरावे घेऊन आम्ही न्यायालयात जाणार, 'सत्याच्या मोर्चा'त उद्धव ठाकरे कडाडले

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray

मुंबई तक

01 Nov 2025 (अपडेटेड: 01 Nov 2025, 04:13 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बोगस आणि दुबार मतदारांचे सगळे पुरावे घेऊन आम्ही न्यायालयात जाणार

point

'सत्याच्या मोर्चा'त उद्धव ठाकरे कडाडले

Uddhav Thackeray at satyacha morcha, Mumbai : "बोगस आणि दुबार मतदारांचे सर्व पुरावे आम्ही जमा करून न्यायालयात नेणार आहोत आणि आता न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा आहे. मतदान चोरीच्या विरोधात आम्ही सर्वांनी एकत्र येऊन लढत आहोत, पण लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतदारांनीही स्वतः जागृत व्हायला हवे. जेथे मतचोर दिसतील तिथे त्यांना पकडा आणि जागेवर फटकवा", असं ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबईत मविआ आणि मनसेने निवडणूक आयोगाविरोधात सत्याचा मोर्चा काढला. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी लोकांनाही सतर्क राहण्याचं आवाहन केलं.

हे वाचलं का?

हेही वाचा : ठाकरे बंधू आणि मविआच्या निवडणूक आयोगाविरोधातील 'सत्याचा मोर्चा'ला सुरुवात; पण मागण्या कोणत्या?

निवडणूक आयोग पुरावे देऊनही कारवाई करत नाही, उद्धव ठाकरेंचा आरोप 

उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही लोकशाहीच्या मार्गाने लढायला सिद्ध आहोत, पण जनतेनेही एकत्र येऊन लोकशाही जिवंत राखावी. आपल्या समोर लोकशाहीचा अंत होत आहे. त्यामुळे जे काही चाललंय ते थांबवणं गरजेचं आहे. अनेक ठळक पुरावे देखील दाखवले तरीही निवडणूक आयोगाने आवश्यक कारवाई न केल्याचा आरोप त्यांनी केला. आम्ही सर्व पुरावे न्यायालयात घेऊन जाऊ, निवडणूक आयोग निष्प्रभ असल्याचे दिसते, परंतु आता न्यायालय काय ठरवते ते पाहणार आहोत,न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. त्यांनी शेवटी जनतेकडे आमच्या पुढील वाटचालीसाठी साथ देण्याची विनंतीही केली.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आपले पक्ष चोरले, नाव चोरले... आता मतदान देखील चोरले जात आहे. महाराष्ट्र देशाला मार्गदर्शन करतो. आता प्रत्येक मतदाराने जागृत होऊन मतदारयादी तपासावी. तुमचं नाव आहे का नाही, तुमच्या पत्त्यावर कोणकोणते अनोळखी मतदार दाखल आहेत का? हे पाहण्याचं आवाहन त्यांनी केले. उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाने निवडणूक आयोगास एक ऑनलाइन अर्ज करण्यात आला होता, ज्यात घरातील मतदार रद्द करण्याची मागणी होती. तपासात हा अर्ज खोटा आणि मोबाईल नंबरही बनावट असल्याचे उघडकीस आले; त्यावर निवडणूक आयोगाने आमच्याशी संपर्क करून त्याची पुष्टी केली. माझ्या नावाने खोट्या नंबरवरून ओटीपी करण्याचा प्रयत्न 23 ऑक्टोबर रोजी झाल्याचेही उद्धव ठाकरेंनी सांगितले आणि यामागे कोणतेही षडयंत्र आहे का हे तपासणे आवश्यक आहे, असेही नमूद केले.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

11 लोकसभा मतदारसंघात लाखो दुबार मतदार असल्याचे पुरावे, येत्या निवडणुकीत दिसल्यास फोडून काढा, राज ठाकरेंचं आवाहन

 

 

    follow whatsapp