Raj Thackeray Uddhav Thackeray Joint interview for Saamana, Mumbai : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पहिल्या संयुक्त मुलाखतीचा टीझर सामनाच्या X हँडलवर शेअर करण्यात आलाय. दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतलीये. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भ्रष्टाचाराच्या गोष्टी करुच नयेत, असं वक्तव्य केलंय. या मुलाखतीचा पहिला भाग गुरुवारी म्हणजे 8 जानेवारी 2026 रोजी सामनाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर पाहायला मिळणार आहे.
ADVERTISEMENT
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा टीझर शेअर करताना सामनाने लिहिलं की, "राज्यकर्त्याचे प्रेम हे राज्यावर असले पाहिजे सत्तेवर असता कामा नये! ऐतिहासिक महामुलाखत... संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी घेतलेली दणदणीत आणि खणखणीत मुलाखत उद्यापासून... भाग 1 गुरुवारी 8 जानेवारी रोजी फक्त सामनावर.."
या मुलाखतीत ठाकरे बंधूंच्या युतीसाठी महाराष्ट्राला 20 वर्षे वाट का पाहावी लागली? याचा खुलासा देखील करण्यात आलाय. शिवाय, राज्यकर्त्याचे प्रेम हे राज्यावर असले पाहिजे सत्तेवर असता कामा नये, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
संयुक्त मुलाखतीत राज ठाकरेंनी मांडलेले मुद्दे
मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र किंवा वेगळी करण्यासाठी या लोकांचा खटोटोप सुरु आहे.
भ्रष्टाचाराच्या गोष्टी देवेंद्र फडणवीसांनी करुच नयेत.
ही बसवलेली माणसं आहेत, आणि बसवलेला माणूस फक्त धन्याचं ऐकतं.
मुंबई खराब व्हायला काळ लोटला.. पुणे ते बघणार नाही, पुणे लवकरात लवकर बरबाद होईल.
मुंबईकरांना काय पाहिजे? हे तिथं जन्माला आल्याशिवाय समजणार नाहीत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महाचावडी: दोन 'ठाकरे' पहिल्यांदाच 'चावडी'वर एकत्र, Super Exclusive मुलाखत लवकरच मुंबई Tak वर!
ADVERTISEMENT











