मातोश्री संकटात! आता रश्मी ठाकरेही मैदानात उतरणार, बालेकिल्ल्यात एन्ट्री

मुंबई तक

• 05:54 AM • 17 Apr 2023

आतापर्यंत पडद्यामागे राहून मुंबईतल्या महिलांच्या संघटना बांधणीचं काम बघणाऱ्या रश्मी ठाकरे आता थेट रस्त्यावरच्याही लढाईत दिसणार आहेत.

Rashmi Thackeray wife of Shiv Sena (UBT) party head and former Chief Minister Uddhav Thackeray will address a party women's wing meeting in Nashik

Rashmi Thackeray wife of Shiv Sena (UBT) party head and former Chief Minister Uddhav Thackeray will address a party women's wing meeting in Nashik

follow google news

शिवसेनेतील फाटाफुटीनं ठाकरे एकाकी पडल्याचं चित्र निर्माण झालंय. जवळपास 40 आमदार, 15 खासदारांनी ठाकरेंची साथ सोडली, उरलेले आमदारही कधी साथ सोडतील, याची शाश्वती नाही. अशा कठीण समयी आतापर्यंत पडद्यामागं राहून काम करणाऱ्या रश्मी उद्धव ठाकरेही मैदानात उतरणार आहेत. पती आणि मुलासोबतच आता रश्मी ठाकरेही संकटात सापडलेल्या मातोश्रीला सावरण्यासाठी सरसावल्या आहेत. रश्मी ठाकरेंची नेमकी स्ट्रॅटेजी काय, रश्मी ठाकरे मैदानात उतरण्याचं टायमिंग काय आणि रश्मी ठाकरे मैदानात उतरल्यानं काय साधणार? हेच आपण समजून घेऊयात… (Rashmi Thackeray wife of Uddhav Thackeray will participate in shiv sena UBT’s women’s wing meeting for the first time)

हे वाचलं का?

मुंबई, ठाण्यानंतर शिवसेनेनं कुठं बाळसं धरलं असेल, शिवसेना वाढली असेल, तर ती नाशकात. उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू सहकारी खासदार संजय राऊतांकडे नाशिकची जबाबदारी आहे. पण, शिवसेनेतील फाटाफुटीत या बालेकिल्ल्यालाच सर्वाधिक तडे गेले.

संजय राऊतांचे डावे-उजवे म्हणून ओळखले जाणारेही एका रात्रीत एकनाथ शिंदेंचे विश्वासू बनले. ठाकरे गटाला अक्षरश: भगदाड पडलं. आताही शिंदेंकडून ठाकरे गटाला रोज सुरूंग लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आधीच अडचणीत असलेले उद्धव ठाकरे आणखी गोत्यात येताना दिसत आहेत.

आदित्य ठाकरेंनंतर रश्मी ठाकरेंही राजकीय मैदानात

डॅमेज कंट्रोलसाठी स्वतः उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मैदानात उतरलेत. अशातच आता ठाकरेंनी डॅमेज कंट्रोलसाठी आणखी आक्रमक रणनीती अवलंबली आहे. ठाकरे पितापुत्रांच्या मदतीसाठी आता रश्मी ठाकरेही मैदानात उतरणार आहेत. आतापर्यंत पडद्यामागे राहून मुंबईतल्या महिलांच्या संघटना बांधणीचं काम बघणाऱ्या रश्मी ठाकरे आता थेट रस्त्यावरच्याही लढाईत दिसणार आहेत.

हेही वाचा >> ‘नळाबरोबर गाड्याची यात्रा’ : शिंदे-फडणवीसांच्या अयोध्या दौऱ्यावर काय म्हणाले ठाकरे?

एप्रिल महिन्याच्या अखेरीस ठाकरे गटातर्फे नाशकात महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. रश्मी ठाकरेंच्या उपस्थितीत हा महिला मेळावा होणार आहे. शिवसेना आणि शिवसैनिक यांचं एक कौटुंबिक नातं आहे. महिला आघाडीच्या कामामुळेच हे नातं निर्माण झालंय. आणि सध्याच्या बिकट परिस्थितीत रश्मी ठाकरेंना मैदानात उतरवून महिला आघाडीला आणखी बळ देण्याची खेळी समोर आलीय.

ठाकरेंची सून करणार राजकीय मैदानात एन्ट्री

रश्मी ठाकरेंच्या उपस्थितीतील मेळाव्याची अजून तारीख निश्चित झाली नाही. पण महिनाअखेरी मेळावा घेण्याच्या दृष्टीनं कामाला लागण्याच्या सूचना जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी पूर्वतयारी बैठकीत दिल्या. रश्मी ठाकरे आतापर्यंत उद्धव ठाकरेंच्या सभेत प्रेक्षकांमध्ये बसलेल्या दिसायच्या. आता पहिल्यांदाच नेत्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. ठाकरेंच्या सूनबाई अशा पद्धतीनं पहिल्यांदाच मैदानात दिसणार आहेत.

    follow whatsapp