रोहित पवारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, नवी मुंबईत काय घडलं?

मुंबई तक

03 Jun 2026 (अपडेटेड: 03 Jun 2026, 11:28 AM)

Rohit Pawar : शरद पवारांच्या राष्ट्रवादीने नवी मुंबईत महागाईविरोधात आंदोलन सुरु केलंय. मात्र, पोलिसांनी यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली आहे.

Rohit Pawar

Rohit Pawar

Google CTA

बातम्या हायलाइट

point

रोहित पवारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं

point

नवी मुंबईत काय घडलं?

Rohit Pawar, नवी मुंबई  : नवी मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं महागाई, इंधन दरवाढ आणि बेरोजगारी विरोधात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवारही सहभागी होऊन रस्त्यावर उतरले होते. यावेळी राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केली होती. दरम्यान, यावेळी पोलिसांनी आमदार रोहित पवार आणि शशिकांत शिंदे यांना ताब्यात घेतलंय. 

हे वाचलं का?

हेही वाचा : पत्नी आणि पोलीस उपनिरीक्षकाच्या कथित अनैतिक संबंधामुळे पोलीस कर्मचाऱ्याने केले नको ते?

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची पीएम मोदींविरोधात घोषणाबाजी 

आंदोलनादरम्यान राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहेत. "सरकार हमसे डरती है, पोलीस को आगे करती है,..", अशा प्रकारची घोषणाबाजी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करत आहेत. दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते काय म्हणाले ? जाणून घेऊयात...

आम्हाला बोलू दिले जात नाही, सरकारकडून बळाचा वापर - रोहित पवार 

रोहित पवार म्हणाले, सरकार ताकदीचा वापर करत आहे. लोकांचे हाल होत आहेत. महागाई वाढली आहे. त्यावर बोलू दिले जात नाही. असंच चालत राहिले तर लोकशाही राहणार नाही. आम्ही घाबरणारे लोकं नाहीत. आम्ही लढत राहणार आहोत. आमच्यासोबत आहेत, ते सामान्य लोकांचे मावळ आहेत. 

या आंदोलनात राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रोहिणी खडसे आणि सक्षणा सलगर देखील सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मात्र, महिला पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Maharashtra Weather : राज्यात विजांचा कडकडाट अन् वादळी वारे, 18 जिल्ह्यांवर संकट घोंगावणार