Sambhaji Bhide: ‘गांधींविरुद्ध बोलण्याची औकात आहे का भिडेची?’, माजी मंत्री प्रचंड संतापले

रोहित गोळे

29 Jul 2023 (अपडेटेड: 29 Jul 2023, 02:06 PM)

संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबातत जे वादग्रस्त विधान केलं त्यावरुन आता त्यांच्यावर तुफान टीका केली जात आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि यशोमती ठाकूर यांनी त्यांच्यावर अत्यंत जहाल शब्दात टीका केली आहे.

Sambhaji Bhide controversial statement on Mahatma Gandhi heavily criticized by congress leaders vijay wadettiwar

Sambhaji Bhide controversial statement on Mahatma Gandhi heavily criticized by congress leaders vijay wadettiwar

follow google news

Sambhaji Bhide Controversial Statemenet on Mahatama Gandhi: मुंबई: शिवप्रतिष्ठानचे संस्थापक आणि कायमच वादग्रस्त विधानं करून चर्चेत राहणारे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी नुकतंच महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे आता त्यांच्यावर विरोधकांकडून टीकेची झोड उठविण्यात येत आहे. संभाजी भिडेंनी गांधीजींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे आता काँग्रेसचे (Congress) माजी मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) आणि यशोमती ठाकूर (yashomati thakur) यांनी खरपूस समाचार घेतला आहे. (Sambhaji Bhide controversial statement on Mahatma Gandhi heavily criticized by congress leaders vijay wadettiwar and yashomati thakur news on maharashtra politics)

हे वाचलं का?

‘गांधींच्या विरुद्ध बोलण्याची याची औकात आहे का?, हा आंबे खाल्ल्याने मुलगा होतो म्हणणारा, हा बिनअक्कलेचा मनोहर भिड्या याने महात्मा गांधींवर अशा प्रकारची टीका करत असेल तर ते लांच्छनास्पद  आहे.’ असं म्हणत वडेट्टीवार यांनी भिडेंविरोधात संताप व्यक्त केला आहे.

तर दुसरीकडे यशोमती ठाकूर यांनी तर भिडेंना थेट देशातूनच तडीपार करा असं म्हणत राज्य सरकारवर देखील गंभीर आरोप केले आहेत.

‘गांधींविरुद्ध बोलण्याची औकात आहे का या मनोहर भिडेची’

‘सगळ्यात आधी हा संभाजी नाही..  याचं संभाजी नाव याचं.. टोपणनाव आहे याचं हा मनोहर भिडे आहे. मराठा आणि बहुजन समाजाच्या तरूणांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली विष पेरण्याचं काम हा संभाजी भिडे करतोय. महात्मा गांधींच्या विरुद्ध बोलण्याची याची औकात आहे का या मनोहर भिडेची. आईन्सटाइन म्हणतात की, महात्मा गांधी हे केवळ हाडामासाचा माणूस नव्हता, तर तो विचाराचा प्रतिक होता. ज्यांच्या विचाराने दक्षिण आफ्रिकेपासून भारतापर्यंत जे अहिंसक आंदोलनं झाली आणि अनेक लोकांना न्याय मिळवून दिला.’

‘हा आंबे खाल्ल्याने मुलगा होतो म्हणणारा, हा बिनअक्कलेचा मनोहर भिड्या याने महात्मा गांधींवर अशा प्रकारची टीका करत असेल तर ते लांच्छनास्पद आणि ज्याचा कुठलाही पुरावा अशी विधानं करून जातीय तेढ निर्माण करणारं जर तो वक्तव्य करत असेल तर यांच्यावर सरकारने तात्काळ कारवाई करावी, गुन्हे दाखल करावे. हा मोकाट फिरता कामा नये.’

हे ही वाचा >> हिंदुस्थानाला तीन बाधा..म्लेंच्छ बाधा, आंग्ल बाधा आणि गांधी बाधा- संभाजी भिडे गुरुजींच विधान

‘आम्ही सुद्धा ठिकठिकाणी राष्ट्रपित्याचा, महात्मा गांधींचा अपमान केल्यामुळे याच्यावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू केली आहे..’ अशी जोरदार टीका वडेट्टीवार यांनी संभाजी भिडेंवर केली आहे.

‘काय भांग पिऊन येता का?’

‘सगळ्यात आधी माझी मीडियावाल्यांना विनंती आहे.. त्याचं खरं नाव सांगा..  त्याचं खरं नाव मनोहर कुलकर्णी असं काही तरी आहे.. तर हा कुलकर्णी संभाजी महाराजांचं नाव स्वत:ला का लावतो? स्वत:च्या प्रतिष्ठानला शिवाजी महाराजांचं नाव का लावतो? हे सगळं करून इकडे येऊ दंगल पसरविण्याचं काम का करतो? विषय असा आहे की, 2024 चा निवडणुका आता समोर आहेत. मोदीजी परदेशात जातात आणि महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होतात आणि RSS च्या विचारधारा आहे ती विकृत विचारधारा आहे.’

‘हे लोकं इथे येऊन त्या मनोहर कुलकर्णीला वाव देतात आणि असे आक्षेपार्ह वक्तव्य करतात. हे सहन केलं जाणार.. गांधीजी आपल्या देशाची प्रतिष्ठा आहे.. ही प्रतिष्ठा अशी कशी मलीन होऊ देऊ..’

‘भिडेवर गुन्हे दाखल झाले पाहिजे. त्याला या देशातून तडीपार केलं पाहिजे. महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशातून तडीपार केलं  पाहिजे.सरकारला हे दिसत नाही का.. असं कसं इतकं बेजबाबदार तुम्ही वागू शकतात. म्हणजे आमच्याकडे व्हिडीओ येऊ शकतो.. पण पोलिसांची गुप्तचर यंत्रणा काय करतेय? काय झोपले आहेत की, कोणत्या विचारधारेला बांधलेले आहेत?’

हे ही वाचा >> Sambhaji Bhide: ‘काळा दिवस, बटीक.. काय लायकीचं स्वातंत्र्य..’, संभाजी भिडे पुन्हा बरळले

‘हे जे आक्षेपार्ह वक्तव्य केलं.. आज तुम्ही राष्ट्रपित्याबाबत असं बोलतात.. तुम्ही काय भांग पिऊन येता का? हे सहन नाही होणार.. याबाबत आंदोलन केलं जाईल.’ असं म्हणत यशोमती ठाकूर यांनी भिडेंसह राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर घणाघाती टीक केली आहे..

संभाजी भिडेंनी नेमकं विधान काय?

अमरावती शहरातील बडनेरा मार्गावर असलेल्या जय भारत मंगलम या ठिकाणी संभाजी भिडेंच्या सभेचं 27 जुलै रोजी रात्री आयोजन केले होते. या कार्यक्रमात बोलताना भिडेंनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं.

संभाजी भिडे म्हणाले होते की, “महात्मा गांधींचे जे वडील म्हटले जातात, ते करमचंद गांधी हे एका मुस्लिम जमीनदाराकडे कामाला होते. त्या जमीनदाराची मोठी रक्कम चोरून करमचंद गांधी पळून गेले होते. त्यामुळे चिडलेल्या मुस्लिम जमीनदाराने करमचंद गांधी यांची पत्नी म्हणजेच महात्मा गांधींच्या आईला पळवून घरी आणले होते.”

“महात्मा गांधी यांच्या आईला पळवून आणल्यानंतर जमीनदाराने त्यांच्यासोबत पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे महात्मा गांधींचे खरे वडील नाहीत, ते त्या मुस्लिम जमीनदाराचे पुत्र आहेत. महात्मा गांधींचे शिक्षण आणि सांभाळ त्याच मुस्लिम जमीनदाराने केला. माझ्याकडे याबद्दल पुरावे देखील आहे”, असं विधान भिडे यांनी केलं होतं.

    follow whatsapp