समजून घ्या: निवडणूक आयोगाचा थेट पहारा! ऐन निवडणुकीत कोणते नवे नियम?

पश्चिम बंगाल निवडणुकीआधी केंद्रीय निवडणूक आयोगाने अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत. ज्याचा थेट परिणाम राजकीय पक्षांवर होऊ शकतो. समजून घ्या याचविषयी सविस्तरपणे.

samjun ghya anuja dhakras election commissions direct surveillance over west bengal legislative assembly what new rules apply amidst  elections

समजून घ्या

अनुजा धाक्रस

• 09:00 AM • 23 Apr 2026

follow google news

कोलकाता: पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांमध्ये आजवर कधीही ऐकलं नव्हतं असे नवनवे नियम निवडणूक आयोगाने आणले आहेत. मतदान प्रक्रिया, मतमोजणी यावर विरोधक अनेकदा आक्षेप घेतात, मात्र यावेळी निवडणूक आयोगाने free and fair इलेक्शन्स व्हावेत म्हणून हे नवे नियम आणले. इतकंच नाही तर निवडणुकांच्या तोंडावर अधिकाऱ्यांच्या बदल्या, ईडी कारवाया यावरूनही बंगाल निवडणुकीची चर्चा होतच आहे. काय आहेत निवडणूक आयोगाचे फक्त बंगाल निवडणुकांसाठीचे हे नियम समजून घेऊ.

हे वाचलं का?

1. ड्राय डे 96 तासांवर 

सहसा मतदानाच्या 48 तास आधीपासून ड्राय डे असतो म्हणजेच मद्यविक्री बंद असते. मात्र, पश्चिम बंगालमध्ये 96 तासांचा ड्राय डे पाळण्यात येणार आहे. 23 आणि 29 एप्रिल असं दोन टप्प्यात बंगालमध्ये मतदान होतंय. दोन्ही टप्प्यांना 96-96 तासांचा ड्राय डे म्हणजे मद्याविक्रेत्यांचं जवळपास 8 दिवसांचं नुकसान होणार आहे. मतदानाच्या वेळी मतदारांना दारूचं आमिष  दाखवू नये किंवा मद्यप्राशन करून मतदान केंद्रावर गोंधळ होऊ नये अशा कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने मतदानाच्या 48 तास आधीपासून ड्राय डे असतो, मात्र बंगालमध्ये 96 तासांचा ड्राय डे लावण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्याने सगळ्यांनाच आश्चर्य वाटतंय.

हे ही वाचा>> "चाणक्य आज जिवंत असते तर त्यांनाही धक्का बसला असता...", त्या टोमण्यावर अमित शाहाही गदागदा हसले!

2. गैरप्रकार घडल्यास पुन्हा मतदान

Representation of People act मधील 58A सेक्शननुसार बूथ कॅप्चरिंग झाल्यास तिथलं मतदान रद्द ठरवलं जाईल. जर तिथल्या रिटर्निंग ऑफिसरचं मत झालं की खरोखर काही गैरप्रकार घडला आहे तर त्या बूथचं मतदान रद्द ठरवून नव्याने घेतलं जाईल. जर नव्याने घेतलेल्या मतदानावेळीही गैरप्रकार घडले तर त्या संपूर्ण मतदारसंघासाठीचं मतदान रद्द ठरवून एका नव्या दिवशी घेण्यात येईल.

3. बाईक रॅलीवर बंदी

निवडणुकांमध्ये शक्तीप्रदर्शनाचं एक माध्यम म्हणून बाईक रॅलीकडेही पाहिलं जातं. पण पश्चिम बंगालमध्ये प्रचारात होणाऱ्या बाईक रॅलीवर पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कोणताही राजकीय पक्ष बंगालमध्ये प्रचारासाठी बाईक रॅली काढून शक्तीप्रदर्शन करू शकणार नाही. एवढ्यावरच हे थांबत नाही तर संध्याकाळी 6 ते सकाळी 6 बाईक चालवता येणार नाही. फक्त मेडिकल एमर्जन्सी किंवा कौटुंबिक कार्यक्रमाला जाणाऱ्यांना सूट देण्यात आली आहे. दिवसासुद्धा बाईक चालवताना ती व्यक्ती एकटीच जाऊ शकते, मागच्या सीटवर बसून कोणी जाऊ नाही शकत.

हे ही वाचा>> Ladki Bahin Yojana : 'त्या' एका कारणामुळे 68 लाख लाडक्या बहि‍णींची खाती बंद, नेमकं काय घडलं?

4. मतदानाच्या ठिकाणी AI कॅमेरा

AI मॉनिटर्ड सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पोलिंग स्टेशनवर नजर असेल. मायक्रो ऑब्सव्हर्स, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, आणि पोलीस यांच्या अंगावरच कॅमेरा असणार आहेत, ज्याने पोलिंग स्टेशनवर नेमकं काय घडतंय आणि कोणाचं कोणासोबत काय बोलणं होतंय, या सगळ्याचं रिअल टाईम ट्रॅकिंग आणि रेकॉर्ड्ससुद्धा राहतील. जर कॅमेरे बंद झाले किंवा कोणत्याही तांत्रिक अडचणी आल्या तर पुन्हा मतदान तात्काळ घेतलं जाऊ शकतं. त्यापलीकडे पोलिंग स्टेशनच्या आजूबाजूच्या परिसरात जर सरकारकडून सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आले आहेत, त्याचाही ताबा केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे.