Sanjay Raut: '...तर महाराष्ट्रातल्या मतदारांचा विराट मोर्चा निघेल', संजय राऊतांचा निवडणूक आयोगाला इशारा

Sanjay Raut On Election Commission Of India : येत्या 20 नोव्हेंबरला राज्याची विधानसभा निवडणूक होणार असून 23 नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल घोषित केला जाणार आहे. तत्पूर्वी, महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात राजकीय कुरघोड्या सुरु झाल्या आहेत.

Sanjay Raut On Election Commission Of India

Mahavikas Aaghadi Press Conference

मुंबई तक

19 Oct 2024 (अपडेटेड: 19 Oct 2024, 06:03 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत संजय राऊतांचं मोठं विधान

point

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंवर राऊतांनी साधला निशाणा

point

संजय राऊत पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले?

Sanjay Raut On Election Commission Of India : येत्या 20 नोव्हेंबरला राज्याची विधानसभा निवडणूक होणार असून 23 नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल घोषित केला जाणार आहे. तत्पूर्वी, महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात राजकीय कुरघोड्या सुरु झाल्या आहेत. मतदार संघ आणि मतदानाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीने महायुतीवर आरोपांची राळ उडवली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाला मोठा इशारा दिला आहे. 

हे वाचलं का?

संजय राऊतांनी निवडणूक आयोगाला कोणता इशारा दिला?

 "माझ्या माहितीप्रमाणे दीडशेच्या आसपास मतदारसंघ आहेत. त्यासाठी विशेष अॅपची निर्मिती करून आमचे झालेले जे अधिकृत मतदार आहेत, त्या प्रत्येक मतदारसंघात किमान दहा हजार मतं डिलीट करायची आणि त्यापेक्षा जास्त बोगस मतं, म्हणजेच जे इकडचे मतदार नाहीत, ती टाकायची आणि निवडणुकीत मतदारयादीत गोंधळ निर्माण करायचा. अशाप्रकारचा एक षडयंत्र उघड झाला आहे. प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या टीम अधिकृतपणे या कामाला लागल्या आहेत.

हे ही वाचा >>  Viral Video : ऐकावं ते नवलच! पोरांनो दाढी ठेवा किंवा गर्लफ्रेंड, पोरी चक्क रस्त्यावरच उतरल्या, घडलंय तरी काय?

त्या सगळ्याचे सूत्रधार चंद्रशेखर बावनकुळे आहेत, असं मला आज दिसतंय. हा तांत्रिक मुद्दा जरी असला, तरी महाराष्ट्राच्या भविष्याचा मुद्दा आहे. हे षडयंत्र आम्ही उधळूच. लोकांमध्ये जागृती निर्माण करू आणि वेळ पडली तर महाराष्ट्राच्या मतदारांचा विराट मोर्चा सुद्धा निवडणूक आयोगावार काढाला लागेल, असा इशारा संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाला दिला आहे. 

महायुतीच्या नेत्यांवर टीका करत राऊत म्हणाले, "महायुतीवाले ज्यांना आम्ही लफंगे म्हणतो. या लफंग्यांच्या साथीला संविधानाने काही विशेष अधिकार दिले आहेत. या देशातील निवडणुका निष्पक्षपणे घेण्याचे जे अधिकार दिले आहेत, त्या अधिकाराचं महाराष्ट्रात कसं उल्लंघन सुरु आहे, पराभवाला घाबरल्यामुळे निवडणुकीत आपण विजयी होऊ शकत नाही. आपण सत्ता गमावतो, या भीतीमुळे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या गृहखात्याच्या अखत्यारित निवडणूक आयोग आहे. त्यांनी लोकशाहीविरोधात फार मोठं कारस्थान केलं आहे. या राज्याच्या जनतेच्या विरोधात केलं आहे. त्याची तक्रार घेऊन कालच महाविकास आघाडीचे नेते निवडणूक आयोगाला भेटले. त्यांनी काही मतदारसंघ ठरवलेले आहेत".

    follow whatsapp