Sanjay Raut on Eknath Shinde and CJI Surya Kant, मुंबई : शिवसेना पक्ष, नाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा गंभीर सवाल उपस्थित केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा फोटो शेअर करत संजय राऊत यांनी “म्हणून तीन वर्ष तारीख पे तारीख!” असा खोचक टोला लगावला आहे.
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या मुंबई दौऱ्याची माहिती दिली होती. “सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत हे आज विशेष कार्यक्रमासाठी मुंबईत आले आहेत. मुंबई विमानतळावर त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले,” असा मजकूर शिंदे यांच्या पोस्टमध्ये आहे. ही पोस्ट शेअर करत संजय राऊत यांनी थेट टीका केली आहे.
राऊत यांच्या पोस्टमधून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या शिवसेना वादाच्या सुनावणीवर अप्रत्यक्षपणे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून सातत्याने “न्यायालयात तारीख पे तारीख दिली जाते, पण निर्णय होत नाही,” असा आरोप केला जातो. आता सरन्यायाधीश आणि एकनाथ शिंदे यांचा फोटो समोर आणत राऊत यांनी हा मुद्दा पुन्हा चर्चेत आणला आहे.
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीची संपूर्ण माहिती (2022 ते 2026)
• 27 जून 2022: शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्रतेच्या नोटिसीवर उत्तर देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने वेळ वाढवून दिला.
• 11 जुलै 2022: सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना आमदारांच्या अपात्रतेवर कोणताही निर्णय न घेण्याचे निर्देश दिले.
• 23 ऑगस्ट 2022: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे हे प्रकरण 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवण्यात आले.
• 14 फेब्रुवारी 2023: 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर या प्रकरणाची नियमित सुनावणी सुरू झाली.
• 17 फेब्रुवारी 2023: 'नबाम रेबिया' प्रकरणाचा संदर्भ 7 न्यायाधीशांच्या पीठाकडे पाठवण्यास सर्वोच्च न्यायालयाने तात्काळ नकार दिला.
• 21 ते 23 फेब्रुवारी 2023: ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांनी कायद्याच्या तांत्रिक मुद्द्यांवर जोरदार युक्तिवाद केला.
• 16 मार्च 2023: सलग सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला.
• 11 मे 2023: सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला; राज्यपालांचा फ्लोअर टेस्टचा निर्णय चुकीचा ठरवला.
• 13 ऑक्टोबर 2023: विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेचा निकाल घेण्यास उशीर केल्याबद्दल न्यायालयाने ताशेरे ओढले.
• 22 जानेवारी 2024: विधानसभा अध्यक्षांच्या 10 जानेवारीच्या निकालाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.
• 14 जुलै 2025: प्रकरणाचे गांभीर्य पाहून न्यायालयाने ऑगस्टमध्ये अंतिम सुनावणी घेण्याचे संकेत दिले.
• 12 नोव्हेंबर 2026: सर्वोच्च न्यायालयाने पक्ष आणि चिन्हाच्या वादावर अंतिम सुनावणीसाठी 21 जानेवारी 2026 ही तारीख निश्चित केली.
• 21 जानेवारी 2026(आज): शिवसेना पक्ष आणि 'धनुष्यबाण' चिन्हाची सुनावणी होऊ शकलेली नाही, ती पुढील चार आठवड्यांत सूचीबद्ध केली जाणार.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडील सुनावणीची माहिती
• 11 मे 2023: सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिले.
• 14 सप्टेंबर 2023: 34 अपात्रता याचिकांवर विधानसभा अध्यक्षांच्या समोर पहिली अधिकृत सुनावणी विधानभवनात पार पडली.
• 13 ऑक्टोबर 2023: अध्यक्षांनी सुनावणीसाठीचे 'मुद्दे' (Issues) निश्चित करून सुनावणीची प्रक्रिया आखली.
• 20 ऑक्टोबर 2023: सुनावणीच्या वेळापत्रकावरून दोन्ही बाजूंनी आपले म्हणणे मांडले.
• 23 नोव्हेंबर 2023: पुराव्यांची तपासणी आणि उलटतपासणीसाठी 18 दिवसांचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले.
• 29 नोव्हेंबर 2023: साक्षीदारांची उलटतपासणी आणि प्रत्यक्ष साक्षी नोंदवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली.
• 11 ते 20 डिसेंबर 2023: नागपूर आणि मुंबईत सलग सुनावणी घेऊन दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद ऐकण्यात आला.
• 20 डिसेंबर 2023: विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणाची संपूर्ण सुनावणी पूर्ण करून निकाल राखून ठेवला.
• 10 जानेवारी 2024: राहुल नार्वेकर यांनी अंतिम निकाल दिला; एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच 'मूळ शिवसेना' असल्याचा निकाल दिला.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Maharashtra Weather : राज्यातील पुढील 12 तास महत्त्वाचे, पुन्हा हिम लाटेचा इशारा, IMD विभागाचा अंदाज
ADVERTISEMENT











