Maharashtra Politics: ‘धरणामध्ये मु@x$ पेक्षा थुंकणं..’, संजय राऊतांची अजित पवारांवर टीका

मुंबई तक

03 Jun 2023 (अपडेटेड: 03 Jun 2023, 11:01 AM)

Maharashtra Politics: नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी आपल्या सहकारी पक्षातील ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले.

sanjay raut to spit shinde group ajit pawar dam criticized ncp mva maharashtra politics

sanjay raut to spit shinde group ajit pawar dam criticized ncp mva maharashtra politics

follow google news

Maharashtra Politics Latest News: मुंबई: शिवसेना (UBT)पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे त्यांच्या एका विचित्र कृतीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. खरं तर दोन दिवसांपूर्वी मीडियाशी बोलताना जेव्हा शिवसेना (शिंदे गट) नेत्यांच्या नावाचा उल्लेख झाला होता. तेव्हा संजय राऊत हे चक्क थुंकले (to spit) होते. ज्यावरुन त्यांच्यावर तुफान टीका केली जात आहे. असं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी संजय राऊतांना तारतम्य बाळगावी असा सल्ला दिला होता. ज्यावर आज (3 जून) नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना संजय राऊतांनी अजित पवारांना जहरी शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे. (sanjay raut to spit shinde group ajit pawar dam criticized ncp mva)

हे वाचलं का?

‘बरोबर आहे की.. धरणामध्ये मु@x$ पेक्षा थुंकणं चांगलं. पण ज्याचं जळतं त्याला कळतं. आम्ही इकडे-तिकडे पळालेलो नाहीत.’ असं म्हणत संजय राऊतांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

‘धरणामध्ये मु@x$ पेक्षा थुंकणं चांगलं..’

‘बरोबर आहे की.. धरणामध्ये मु@x$ पेक्षा थुंकणं चांगलं.. संयम तर राखला पाहिजे प्रत्येकाने हे बरोबर आहे. पण ज्याचं जळतं त्याला कळतं. आम्ही भोगतो आहोत. आम्ही भोगून सुद्धा जमिनीवर आहोत. इकडे-तिकडे पळालेलो नाहीत. मी माझ्या पक्षासोबत ठामपणे उभे आहोत. आमच्या मनात पक्ष बदलण्याचा, आमच्यावर संकटं येत आहेत म्हणून भाजपसारख्या पक्षासोबत सूत जुळविण्याचा आमच्या मनात विचार येत नाही.’

‘ज्यांनी ठाकरे कुटुंबीयांशी, शिवसेनेशी बेईमानी केली.. त्यांची नावं समजली तेव्हा माझी जीभ चावली गेली.. त्यातून ती रिअॅक्शन झाली. माझ्या इतकं चांगलं संतुलन कोणाचंच नाही. माझ्यामुळे अनेकांचं संतुलन बिघडलं आहे. हे त्यांनी मान्य करावं.’ असं म्हणत संजय राऊत यांनी अजित पवारांना थेट प्रत्युत्तर दिलं आहे.

अजित पवार म्हणाले, ‘ती मोठी माणसं, आम्ही आदर करतो…’

दरम्यान, संजय राऊतांच्या प्रतिक्रियेनंतर अजित पवारांना याबाबत जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की, ‘काही आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत. ती मोठी माणसं आहेत.. आम्ही त्यांचा आदर करतो. ही आपली संस्कृती नाही. त्यांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे. मला त्याबद्दल अधिक काही बोलायचं नाही.’ असं म्हणत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

नाशिकमधून संजय राऊतांचा शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल

‘कशाकरिता पाहायचं.. त्यांना नाही काम-धंदा.. ना कार्यकर्ते.. कशाला जोडे मारतायेत.. लोकांनी इतके जोडे मारलेत त्यांना वर्षभरात. लोकं निवडणुकीची वाट पाहत आहेत.. जोडे मारण्यासाठी. आपला त्यांचा टाइमपास करत असतील तर करू दे..’

‘ज्या पद्धतीने या लोकांनी शिवसेनेशी बेईमानी केली, ठाकरे कुटुंबाशी बेईमानी केली.. यांना काय अधिकार आहे दुसऱ्यांना जोडे मारण्याचा.. त्यांनी ते जोडे स्वत:ला मारून घेतले पाहिजे. जोडे मारावं असं काय केलंय.. विषय समजून घेत नाही.. बिनडोक लोकं आहेत. लोकांना कळू द्या हे किती बेईमान लोकं आहेत ते. अशा जोडे मारो आंदोलनने खऱ्या शिवसेनेवर काही परिणाम होत नाही.’

हे ही वाचा>> Maharashtra politics : शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांची का घेतली भेट?

‘काल हे शिवराज्याभिषेक सोहळा करून आले. म्हणजे बेईमान जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा सोहळा करतायेत. ज्यांनी शिवशाहीशी गद्दारी केली.. ते शिवशाहीचा सोहळा करतायेत यासारखं महाराष्ट्रात दुर्दैव नाही.’

‘मी काय कृती केली… कुठे थुंकलो मी, कोणावर थुंकलो मी? बघा.. हे वीर सावरकरांचे भक्त आहेत. सावरकरांना न्यायालयात एकदा आणण्यात आलं होतं. सावरकरांनी पाहिलं की, त्यांची माहिती देणारा एक बेईमान न्यायालयाच्या कोपऱ्यात उभा आहे. ते त्याकडे बघून थुंकले.. इतिहासात नोंद आहे. तेव्हा थुंकणं बेईमानांवर ही हिंदू संस्कृती आहे. हिंदुत्व याचा भाग आहे.. संताप व्यक्त करणं.. पण मी कोणावरही थुंकलेलो नाही. सावरकरांनी देखील बेईमानांवर, देशाच्या गद्दारांवर थुंकून व्यक्त केला होता न्यायालयात.’

‘मी सावरकरांचा भक्त आहे… सावरकर असतील, लोकमान्य टिळक असतील, बाळासाहेब ठाकरे असतील या सगळ्यांच्या चांगल्या गोष्टी आम्ही घेत असतो. शेवटी चीड आणि संताप आहे ही कोणत्याही प्रकारे व्यक्त होऊ शकते. तुम्ही जे म्हणताये.. थुंकलो.. थुंकलो.. कुठे थुंकलो.. दाखवा ना मला..’

हे ही वाचा>> काँग्रेस नेत्याचा गोपीनाथ मुंडेंनी ‘असा’ केलेला करेक्ट कार्यक्रम, तावडेंनी सांगितला भन्नाट किस्सा

‘मी काल सांगितलं.. माझा जो दाताचा प्रॉब्लेम होता. त्यातून झालेली ती कृती आहे. त्यांना असं वाटतं की, लोकं आमच्यावर थुंकतायेत. ही त्यांची मानसिकत आहे. त्यांना झोपेत सुद्धा वाटतं की, लोकं आम्हाला जोडे मारतायेत. खरं आहे की, लोकं त्यांच्यावर थुंकतायेत.. हे खरं आहे.. पण ते मी कशाला व्यक्त करू ना..’ असं म्हणत संजय राऊत यांनी एक प्रकारे आपल्या थुंकण्याच्या कृतीचं कौतुकच केलं आहे.

    follow whatsapp