‘बाळासाहेबांचे विचार गहाण ठेवणाऱ्यांच्या आम्ही…’, CM शिंदेंची ठाकरेंवर सडकून टीका

मुंबई तक

• 01:49 PM • 24 Jun 2023

Maharashtra political news: मोदी सरकार पुन्हा देशात येऊ नये यासाठी विरोधक मोर्चेबांधणी करत आहेत. ज्यासाठीची पहिली बैठक पाटण्यात पार पडली. पण याच बैठकवरुन CM शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

cm eknath shinde criticized udhhav thackeray mhada mumbai lottery drawn

cm eknath shinde criticized udhhav thackeray mhada mumbai lottery drawn

follow google news

Maharashtra political news: मुंबई: देशात भाजपविरोधी पक्षांची बैठक काल (23 जून) पाटण्यामध्ये (Patna) पार पडली. या बैठकीला महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे, (Uddhav Thackeray) शरद पवार (Sharad Pawar) हे उपस्थित होते. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपविरोधात टीका देखील केली. ठाकरे यांच्या तिथल्या भूमिकेवर आणि उपस्थितीवर मुखमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री असताना फक्त दोन वेळा मंत्रालयात गेलेले काल सत्तेच्या लालसेने थेट पाटण्याला पोहोचले असल्याचं म्हणून शिंदेंनी हल्लाबोल केला आहे. (shiv sena ubt uddhav thackeray patna opposition meeting cm shinde strongly criticized balasaheb thoughts mehbooba mufti)

हे वाचलं का?

मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्वीट करत काय म्हटलं?

‘मुख्यमंत्री असताना फक्त दोन वेळा मंत्रालयात गेलेले काल सत्तेच्या लालसेने थेट पाटण्याला पोहोचले. सत्तेसाठी आधीच हिंदुत्व खुंटीला टांगले होते, काल पाटणा येथे जाऊन ते वेशीवर टांगले. केवळ आणि केवळ मोदींना विरोध करण्यासाठी एकत्र आलेल्या लोकांची आघाडी होणार नाही व झाली तरी या स्वार्थी आघाडीला लोक स्वीकारणार नाहीत.’

हे ही वाचा >> Pune MPSC: दर्शना पवारची राहुलने केली दगडाने ठेचून हत्या?, धक्कादायक माहिती समोर

‘सत्तेसाठी शिवसेना पक्ष, बाळासाहेबांचे विचार गहाण ठेवणाऱ्या अशांच्या विरोधात आम्ही एक वर्षापूर्वी उठाव केला. कालच्या बैठकीमुळे आमची भूमिका किती योग्य होती हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. बाळासाहेबांनी ज्या काँग्रेस, राजद, पीडीपी, राष्ट्रवादी काँग्रेस, जेडीयू यांच्यावर कायम सडकून टीका केली होती, त्याच लोकांच्या टोळीत हे सामील झाले आहेत. याच लोकांनी हिंदुत्वाला, राम मंदिर उभारणीला आणि कलम 370 रद्द करण्याला कडाडून विरोध केला होता, हे विसरून त्यांचेच उंबरे हे झिजवत आहेत. 370 कलमाचे समर्थन करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती यांच्या शेजारी बसून एकोप्याच्या गप्पा करत आहेत.’

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा द्वेष हा या सर्व विरोधकांचा एक कलमी कार्यक्रम आहे. हिंमत असेल तर त्यांनी आघाडीचा नेता जाहीर करावा. पण तसे होणार नाही. कारण प्रत्येकजण पंतप्रधान होण्याची स्वप्न पाहात आहे. आत्मविश्वास गमावलेल्या या सर्व नेत्यांच्या चेहऱ्यावर नैराश्यच दिसत होते. मोदीजींचा पराभव करण्यासाठी 15 पक्ष एकत्र येत आहेत. हाच मोदीजींच्या कर्तृत्वाचा, नेतृत्वाचा विजय आहे. केवळ स्वार्थासाठी एकत्र आलेल्यांना 2024 च्या निवडणुकीत जनता त्यांची जागा दाखवून देईल.’

हे ही वाचा >> ‘देवेंद्रजी तुमच्या परिवाराचेही WhatsApp चॅट…’, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांनी डिवचलं

‘कालच्या बैठकीत चारा घोटाळ्यात गजाआड गेलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या मांडीला मांडी लाऊन बसलेले लोक आता मुंबईतल्या भ्रष्टाचाराची आवई उठवून 1 जुलै रोजी मोर्चा काढणार आहेत. त्यांना तो नैतिक अधिकार तरी आहे का?’

आता मुख्यमंत्र्यांच्या या ट्वीटला आता शिवसेना ठाकरे गटाकडून काय उत्तर दिलं जातंय हे पाहणं महत्वाचं आहे.

    follow whatsapp