Shivsena Hearing : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज (दि.15) अत्यंत महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान CJI Surya Kant यांनी ठाकरे गटाचे (UBT) वकील देवदत्त कामत आणि ठाकरे गटाच्या नेत्यांना तीव्र शब्दांत फटकारले आहे. ठाकरे गटाच्या वकिलांनी जेव्हा सरन्यायाधीशांना त्यांच्या सोयीनुसार या प्रकरणाची तारीख लवकरात लवकर निश्चित करण्याची विनंती केली, तेव्हा न्यायालयाने संतप्त भावना व्यक्त केल्या. न्यायालयात एकीकडे तारखेची मागणी करायची आणि दुसरीकडे बाहेर जाऊन न्यायालयाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे, अशी भूमिका खपवून घेतली जाणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. ठाकरे गटाच्या नेत्यांच्या वक्तव्यांवरुन न्यायालयाने थेट आक्षेप घेतला आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Astrology : सूर्याचा वृषभ राशीत प्रवेश, 'या' राशींवर संकटाची टांगती तलवार, 12 राशींचं जाणून घ्या भविष्य
सरन्यायाधीशांनी ठाकरे गटाच्या वकिलांना खडसावताना सांगितले की, सर्वप्रथम तुम्ही तुमच्या लोकांना माध्यमांसमोर जाऊन सर्वोच्च न्यायालय निर्णय घेत नसल्याची बेजबाबदार विधाने करण्यापासून रोखा. तुम्ही येथे न्यायालयात तारखेची मागणी करता आणि बाहेर जाऊन न्यायालय काम करत नसल्याचे भासवता. यापुढे न्यायालयाच्या कामकाजाबाबत शब्द वापरताना काळजी घ्या, कारण मी अशा प्रकारचे वर्तन स्वीकारणारा व्यक्ती नाही, अशा कडक शब्दांत सरन्यायाधीशांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली.
हेही वाचा : Astrology : सूर्याचा वृषभ राशीत प्रवेश, 'या' राशींवर संकटाची टांगती तलवार, 12 राशींचं जाणून घ्या भविष्य
सरन्यायाधीश ठाकरे गटाच्या वकिलांवर संतापले
ठाकरे गटाच्या भूमिकेवर बोट ठेवत सरन्यायाधीशांनी पुढील सुनावणीदरम्यान तीव्र आक्षेप नोंदवले. ते म्हणाले की, तुम्हाला न्यायालयात कायदेशीर युक्तिवाद करायचा नसून केवळ विधाने करण्यात रस आहे असे दिसते. जेव्हा हे प्रकरण सुनावणीसाठी समोर येते, तेव्हा तुम्ही आम्हाला तारीख निश्चित करण्यास सांगता आणि जेव्हा आम्ही तारीख निश्चित करतो, तेव्हा तुमचे नेते बाहेर वेगळीच विधाने करतात. एका विशिष्ट राजकीय नेत्याकडून सातत्याने अशी विधाने का केली जात आहेत? असा थेट सवाल सरन्यायाधीशांनी उपस्थित केला.
वकिलांची न्यायालयात सारवासारव आणि पुढील प्रक्रिया
सरन्यायाधीशांचा आक्रमक पवित्रा आणि संतप्त विधाने पाहिल्यानंतर ठाकरे गटाच्या बाजूने उपस्थित असलेले वकील देवदत्त कामत यांनी न्यायालयात परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण केवळ पुढील दिशा ठरावी, यासाठी कामकाजाच्या यादीत दाखवण्यात आले होते, अशी सारवासारव वकील कामत यांनी न्यायालयासमोर केली. मात्र, न्यायालयाने अत्यंत कडक शब्दांत नाराजी व्यक्त केल्यामुळे आता पुढील काळात ठाकरे गटाचे नेते वक्तव्ये करणे टाळतात का? हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
बंद खोली आणि 31 दिवस, अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; नेमकी घटना काय?
ADVERTISEMENT











