'वकिलाने गाडीचा दरवाजा लावला अन्...' बोटावर जखम कशी झाली? सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण; नेमकं काय म्हणाले?

Sunil Tatkare on finger injury : खासदार सुनील तटकरे यांच्या बोटावर जखमा असलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अखेर ही जखम कशामुळे झाली? याबाबत सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलंय.

Sunil Tatkare on finger injury

Sunil Tatkare on finger injury

मुंबई तक

24 Mar 2026 (अपडेटेड: 24 Mar 2026, 12:19 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

'वकिलाने गाडीचा दरवाजा लावला अन्...' बोटावर जखम कशी झाली?

point

सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण; नेमकं काय म्हणाले?

Sunil Tatkare on finger injury : अशोक खरात या भोंदूबाबाचे काळे कारनामे समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. विशेष या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप झाले त्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर या तंत्रमंत्र विद्या करायच्या. त्यासाठी चाकणकर यांनी स्वत:ची अनामिका कापली होती, असा आरोप केला. त्यानंतर चाकणकर यांचे बोटांवरील जखमांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. दरम्यान, चाकणकर यांच्याबरोबरच खासदार सुनील तटकरे यांच्या बोटावर झालेल्या जखमांचे फोटो देखील सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते. मात्र, आज सुनील तटकरे यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषद याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : अनामिकेला जखम कशी झाली? स्पष्टीकरण देण्यासाठी रुपाली चाकणकरांनी थेट व्हिडीओ केला पोस्ट

सुनील तटकरे म्हणाले, "माझ्या बोटावर लोकसभेच्या निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या दोन दिवस आधी जखम झाली. वकील प्रवीण ठाकूर हे माझ्या जिल्ह्यातील ज्येष्ठ वकील आहेत. मधूशेठ ठाकूर म्हणजे आमचे माजी आमदार होते, यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी मी गेलो होतो. त्यावेळी प्रवीण ठाकूर मला भेटायला आले होते. प्रवीण ठाकूरांनी कबुल केलं की, ते विरोधी उमेदवार असलेल्या गितेंचं काम करत होते. मात्र, तरिही ते मला भेटायला आले. त्यांना भेटून निघालो असताना त्यांनी दरवाजा लावला. त्यावेळी माझ्या बोटावर जखम झाली. त्यानंतर मी रुग्णालयात गेलो होतो. त्यानंतर मला स्टॅपलने टाके मारले होते. नंतर मी दिल्लीत आलो होतो, त्यावेळी ते होते. याचा अर्थ कोण कुठे लावणार असेल तर दुर्दैव आहे."

पुढे बोलताना तटकरे म्हणाले, "मी आरोप करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. दुसरा फोटो मॉर्फ केलेला देखील आला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी एसआयटी स्थापन केली आहे. सखोल पणाने तपास करण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. खरातविरोधात कठोर कारवाई केली जावी, ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. मी 2019 आणि आणि 2024 दोन वेळेस निवडून आलोय. माझी काम करण्याची पद्धती माझ्या जिल्ह्यातील लोकांना माहिती आहे. ज्यांनी आरोप केले आहेत, त्याच्यावर गुन्हे दाखल करत आहोत. अधिक खोलवरपणे खरात प्रकरणाचा तपास व्हावा."

इतर महत्त्वाच्या बातम्या 

दोन पत्नींसोबत एकाच घरात राहायचा, 18 मुलं झाली...,पण शेवटी पोत्यात मृतदेह सापडलं, मुन्नासोबत काय घडलं?