Supreme Court Over CJP Protest : दिल्लीत सध्या कॉकरोच जनता पार्टीचे निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन सुरू आहे. लोकशाही वाचवण्याच्या पार्श्वभूमीवर आता देशातील काही जनता ही रस्त्यावर उतरली आहे. जिकडे तिकडे दडपशाही केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. यावरून सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलनाशी संबंधित याचिकांवर सुनावणी केली. सुनावणी सुरू असताना, न्यायालयात वकील आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला होता. 10 ऑक्टोबरच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप वकिलांनी केला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Astrology : शारदीय नवरात्रोत्सवाचा आरंभ, 'या' राशींवर देवी मातेचा आशीर्वाद
अतिरिक्त बळाचा वापर करत आंदोलकांना बेकायदेशीररित्या अटक
पुढे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, पोलीस अधिकाऱ्यांनी बॅजशिवाय काम करणे, अतिरिक्त बळाचा वापर करत बेकायदेशीररित्या अटक या आरोपांना उत्तर देणे गरजेचे आहे. न्यायालयाने बॅरिकेड्सचा तात्काळ आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत आणि घटनेच्या कलम 32 अंतर्गत मूलभूत अधिकारांचे संरक्षण करणे हे कर्तव्य असल्याचे म्हटले आहे.
'मेट्रो आणि रेल्वे सेवा सामान्यपणे सुरु राहतील'
सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, कायद्यानुसार वगळता कोणालाही ताब्यात घेतलं जाऊ शकत नाही. मेट्रो आणि रेल्वे सेवा सामान्यपणे सुरु राहतील, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. सार्वजनिक व्यत्यय येण्याची अधिक शक्यता असल्यास निर्बंध लादण्याची अधिकची शक्यता आहे. तसेच इंटरनेट सुविधांवर व्यत्यय आणू नयेत, असे न्यायालयाने निर्देश दिलेत.
हे ही वाचा : "मी भारतीय नागरीक आहे अन् राहणार", ध्रुव राठीने पासपोर्ट दाखवत शेअर केला VIDEO
इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश
एवढंच नसून न्यायालयाने पोलिसांची कारवाई, मेट्रो व रस्ते बंद करणे आणि फोन जॅमरच्या वापराला आव्हान देण्यात आले होते. सुनावणीनंतर, न्यायालयाने मेट्रो, रेल्वे आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश दिलेत.
ADVERTISEMENT












