NCP: ”ते पाप एका अदृश्य शक्तीने…”, सुप्रिया सुळे का झाल्या भावुक?

मुंबई तक

• 06:38 PM • 25 Jan 2024

Supriya Sule vs BJP: 25 वर्ष आदर आणि खेळीमेळीच्या वातावरणात पक्ष चालला. मात्र, दुर्दैवाने या चांगल्या वातावरणात मीठ टाकण्याचे पाप.. एका अदृश्य शक्तीने केले.’ असं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

supriya sule attacked bjp again see what he did statement about ajit pawar and ncp party

supriya sule attacked bjp again see what he did statement about ajit pawar and ncp party

follow google news

Supriya Sule attack on BJP: बारामती: ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पवार साहेबांचे ‘बाळ’ आहे. ते पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. कुटुंबाप्रमाणे त्यांनी पक्ष सांभाळला, वाढवला आहे. सत्ता आली त्यावेळी राज्याला आणि देशाला नेतृत्व मिळाले. 25 वर्ष आदर आणि खेळीमेळीच्या वातावरणात पक्ष चालला. मात्र, दुर्दैवाने या चांगल्या वातावरणात मीठ टाकण्याचे पाप.. एका अदृश्य शक्तीने केले.’ असं विधान करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळेंनी भाजपवर हल्ला चढवला. (supriya sule attacked bjp again see what he did statement about ajit pawar and ncp party)

हे वाचलं का?

खासदार सुप्रिया सुप्रिया सुळे आज (25 जानेवारी) बारामती दौऱ्यावर होत्या. त्यांना पक्ष सुनावणीबाबत विचारले असता सुळे म्हणाल्या की, ‘निवडणूक आयोगाच्या प्रत्येक सुनावणीला पवार साहेब उपस्थित राहिलेले आहेत. शेवटी आपल्या लोकांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे.’ सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून आशा वर्कर व अंगणवाडी सेविकांच्या कार्याचा सन्मान सोहळा याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

हे ही वाचा >> धक्कादायक.. शरद पवारांच्या ‘या’ निकटवर्तीयावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

‘आयुष्यात सध्या संघर्षाचा काळ आहे’

‘शिवसेनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष आपलाच असल्याचा दावा केला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळा पक्ष काढण्याचे भाष्य केले होते. या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.. याबाबत सुळेंना विचारले असता, त्या म्हणाल्या की.. ‘मी एवढा विचार केलेला नाही. झाले गेले गंगेला मिळाले.. जे सत्य आहे त्या मार्गाने चालायचं.. आमच्या आयुष्यात सध्या संघर्षाचा काळ आहे.. प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्षाचा काळ येतो.. त्यावर निष्ठेने, सत्यने असते. हा मार्ग अनेक वेळा अवघड असतो.. मात्र शेवट सत्यमेव जयते..’ अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली.

रोहित पवारांच्या ईडी चौकशीवर सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

रोहित पवारांच्या ईडी चौकशीबाबत विचारले असता सुळे म्हणाल्या की, ‘विरोधी बोलला की, त्याला ‘ICE’ केलं जातं म्हणजे.. इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी, ही नवीन पद्धत मागील आठ दहा वर्षापासून देशात सुरू झाली आहे. कदाचित याच कारणामुळे रोहित पवारांना नोटीस आली असावी. अशी दबकी चर्चा समाजात ऐकू येत आहे.’ अशी प्रतिक्रिया खासदार सुळे यांनी दिली.

हे ही वाचा >> Maratha Reservation : जरांगेंची मुख्यमंत्र्यांना चर्चेची विनंती, CM शिंदे म्हणाले, ‘माझे अधिकारी…’

रोहित पवारांच्या झालेल्या चौकशीबाबत सत्ताधाऱ्यांकडून इव्हेंट म्हणून संभावना करण्यात येत आहे. यावर बोलताना सुळे म्हणाले की, ‘सत्ताधाऱ्यांना हा इव्हेंट वाटत असेल.. सत्ताधाऱ्यांनी कश्मीर ते कन्याकुमारी ज्या-ज्या लोकांवर आरोप केले आणि तीच लोकं भाजपमध्ये गेली तेव्हा त्यांच्या केसचं काय झालं? जे विरोधात आहे. ते गुन्हेगार, भ्रष्टाचारी हेच आरोप जेव्हा भाजप करते. तेव्हा आरोप करणाऱ्यांना त्यांच्या पक्षात घेतं. तेव्हा ते वॉशिंगमशीनद्वारे जातात कुठे?’ असं म्हणत सुप्रिया सुळेंनी यावेळी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

    follow whatsapp