धक्कादायक.. शरद पवारांच्या ‘या’ निकटवर्तीयावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

मुंबई तक

ADVERTISEMENT

a fraud case has been filed against abhijit patil who is considered close to ncp chief sharad pawar
a fraud case has been filed against abhijit patil who is considered close to ncp chief sharad pawar
social share
google news

NCP: सोलापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे सोलापुरातील निकटवर्तीय अभिजित पाटील (Abhijit Patil) यांच्यासह कारखान्याच्या संचालक मंडळावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राज्य सहकारी बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. अभिजित पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होताच सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. (a fraud case has been filed against abhijit patil who is considered close to ncp chief sharad pawar)

दरम्यान अभिजित पाटील यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, ‘ही कारवाई सूडबुद्धीने केली असून कारखान्यावरील कर्ज हे मागील संचालक मंडळाच्या काळातील असून शेतकऱ्याचे मागील थकीत बिल वेळेत दिल्या मुळे कर्जावरील व्याज थकले आहे ते आपण फेडण्यासाठी बँकेसोबत आपली बोलणी सुरु आहे.’ अशी माहिती त्यांनी दिली आहे.

नेमकं प्रकरण काय?

अभिजीत पाटील हे शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. आगामी विधानसभा निवडणुकीत पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. 2023 मध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अभिजीत पाटील यांचे पॅनल निवडून आले होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Pune : गुंड गजा मारणे सपत्नीक पार्थ पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात मोठी खळबळ?

सध्या अभिजित पाटील पंढरपूरजवळच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. या कारखान्यातील पूर्वीच्या संचालक मंडळाने राज्य सहकारी बँकेकडून वेळोवेळी कर्ज घेतले होते. या कर्जाची रक्कम तब्बल साडेचारशे कोटींहून अधिक आहे. बँकेने वेळोवेळी नोटीस देऊन सुद्धा संचालक मंडळाने कर्जाची परतफेड केली नाही.

त्यामुळे राज्य सहकारी बँकेने थकीत रक्कम वसूल करण्यासाठी संचालक मंडळाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. बँकेच्या तक्रारीनुसार पंढरपूर शहर पोलिसांनी अभिजित पाटील यांच्यासह 20 संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अभिजित पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होताच जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, राजकीय द्वेषापोटी माझ्यावर आणि संचालक मंडळावर गुन्हा दाखल केला आहे, अशी प्रतिक्रिया विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी दिली आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> संदीप राऊतांच्या ED नोटीसीवर राऊत कडाडले, ‘फडणवीसांच राज्य आहे की अफजलखान…’

दरम्यान, कारखान्याचे चेअरमन व संचालक मंडळावर सूडबुद्धीने केलेल्या कारवाईचा जाहीर निषेध करण्यासाठी आज कर्मचारी, शेतकरी सभासद, कार्यकर्ते कारखान्यावर मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT