Abhishek Ghosalkar : मॉरिसने घोसाळकरांना गोळ्या घातल्याचं फुटेज कुठे?, हत्या प्रकरणावर अंधारेंना संशय

प्रशांत गोमाणे

09 Feb 2024 (अपडेटेड: 10 Feb 2024, 01:23 PM)

Sushma andhare Abhishek Ghosalkar murder case : शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गुरूवारी रात्री गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या संपूर्ण घटनेवर आता ठाकरेंच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी संशय व्यक्त केला आहे. तसेच या घटनेवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गुरूवारी रात्री गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडानंतर हल्लेखोर मॉरिस भाईने स्वत:वर गोळीबार करून आत्महत्या केली होती.

sushma andhare abhishej ghosalkar murder case dahisar firing case sushma andhare two accused arrested

follow google news

Sushma andhare Abhishek Ghosalkar murder case: मुंबई: शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गुरूवारी रात्री गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडानंतर हल्लेखोर मॉरिस भाईने स्वत:वर गोळीबार करून आत्महत्या केली होती. या संपूर्ण घटनेवर आता ठाकरेंच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी संशय व्यक्त केला आहे. तसेच या घटनेवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.  (sushma andhare abhishej ghosalkar murder case dahisar firing case sushma andhare two accused arrested)  

हे वाचलं का?

सुषमा अंधारे यांची फेसबुक पोस्ट जशाच तशी 

''मॉरिसने घोसाळकरांना गोळ्या घातल्याचं फुटेज कुठे समोर आलंय का?? फक्त गोळ्या लागताना दिसल्या, त्या कोणी मारल्या हे दिसलंच नाही... आणि मॉरिस स्वतः सराईत गुन्हेगार होता, तो आधीही तुरुंगात जाऊन आलेला आहे. मग तुरुंगात राहण्याची सवय असताना ह्यावेळी त्याने आत्महत्या का केली असेल?''


''बरं आत्महत्या केली आहे असं एकवेळ मानलं तरी त्याने स्वतःला चार गोळ्या झाडल्या ?? शक्य आहे का हे?? माणूस पहिल्याच गोळीत अर्धमेला होतो, त्यात ह्या मॉरीसने स्वतःवर 4 गोळ्या कशा काय झाडल्या???''


''भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर केलेल्या गोळीबाराचे सीसीटिव्ही फुटेज काही तासांत व्हायरल केले गेले, मग ह्यावेळी त्या मॉरीसच्या कार्यालयातील सीसीटिव्ही फुटेज एक रात्र उलटून गेली तरी का बाहेर येऊ दिलं जातं नाहीये???
दोघांच्या भांडणात तिसराच कोणीतरी आपला राजकीय मार्ग साफ करून गेलाय असं तर काही नाहीये ना???''


''पोलिसांनी अगदी निःपक्षपाती चौकशी करायला हवी. तरचं महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेची ढासळलेली प्रतिमा आणि पोलिसांची होत असलेली बदनामी थांबण्यास थोडी फार मदत होईल. बरेच प्रश्न अनुत्तरित आहेत.''

नेमकी घटना काय?

अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस हे फेसबुकवर लाईव्ह होते त्यावेळी मेहुल पारेख देखील घटनास्थळी उपस्थित असल्याचे बोलले जात आहे. त्याच्या चौकशीतून अनेक गोष्टींचा खुलासा होण्याची देखील शक्यता आहे.  

मॉरिस नोरोन्हा नावाच्या व्यक्तीने अभिषेक घोसाळकर यांच्यावर एकामागून एक पाच गोळ्या झाडल्या होत्या, त्यापैकी तीन गोळ्या घोसाळकर यांना लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. तसंच या प्रकरणी सखोल तपास मुंबई पोलीस करत आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेला मेहुल पारेख हा आरोपी मॉरिस नोरोन्हाचा पीए होता. त्याच्यासह रोहित साहू नावाच्या आणखी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. 

    follow whatsapp