“चार हात असलेली लक्ष्मी कशी जन्म घेऊ शकते”, SP नेत्याच्या ट्विटने भडकला नवा वाद

प्रशांत गोमाणे

• 10:21 AM • 13 Nov 2023

समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. ‘चार हात असलेली लक्ष्मी कशी जन्म घेऊ शकते?’ असे विधान करून स्वामी प्रसाद मौर्य यांनी हिंदू देवी देवतांवर आक्षेपार्ह टीप्पणी केली आहे.

swami prasad maurya controversial statement on hindu goddess laxmi diwali 2023

swami prasad maurya controversial statement on hindu goddess laxmi diwali 2023

follow google news

Swami Prasad Maurya Controversial Tweet : आपल्या वादग्रस्त विधानामुळे नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. ‘चार हात असलेली लक्ष्मी कशी जन्म घेऊ शकते?’ असे विधान करून स्वामी प्रसाद मौर्य यांनी हिंदू देवी देवतांवर आक्षेपार्ह टीप्पणी केली आहे. तसेच तुम्हाला जर लक्ष्मी देवीचीच पुजा करायची असेल तर घरातल्या महिलांची करा, त्या खऱ्या अर्थाने देवी असल्याचेही स्वामी प्रसाद मौर्य यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानावरून आता मोठा वाद पेटण्याची शक्यता आहे. (swami prasad maurya controversial statement on hindu goddess laxmi diwali 2023)

हे वाचलं का?

स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांनी एक्स या सोशल माध्यमावर त्यांच्या घरातील दिवाळी साजरी करतानाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनला त्यांनी लिहले की, ‘चार हात असलेली लक्ष्मी कशी जन्म घेऊ शकते?’ तसेच तुम्हाला जर लक्ष्मी देवीचीच पुजा करायची असेल तर घरातल्या महिलांची करा, त्या खऱ्या अर्थाने देवी असल्याचाही सल्ला स्वामी प्रसाद मौर्य यांनी नागरीकांना दिला आहे.

हे ही वाचा : World Cup 2023 Semi final Schedule: केव्हा आणि कुठे होणार विश्वचषक सेमीफायनल मॅच?

स्वामी प्रसाद मौर्य यांची पोस्ट जशीच्या तशी

‘दीपोत्सवानिमित्त पत्नीची पूजा आणि सन्मान करताना स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले की, संपूर्ण जगातील प्रत्येक धर्म, जात, वंश, रंग आणि देशात जन्मलेल्या मुलाचे दोन हात-पाय, दोन कान, एकच डोकं,पोट आणि पाठ सोबत दोन डोळे,दोन छिद्रे असलेले नाक असतात. मग चार हात, आठ हात,दहा हात,वीस हात आणि हजार हात असलेले मूल आजपर्यंत जन्माला आलेले नाही. मग लक्ष्मी चार हातांनी कशी जन्माला येईल? जर तुम्हाला लक्ष्मी देवीचीच पुजा करायची असेल तर खऱ्या अर्थाने देवी असलेल्या तुमच्या पत्नीची पूजा आणि आदर करा. कारण ती तुमच्या कुटुंबाचे पालनपोषण, सुख, समृद्धी, अन्न आणि काळजी घेण्याची जबाबदारी मोठ्या भक्तीने पार पाडते.’

हे ही वाचा : ‘मला मुख्यमंत्री करा, एका चुटकीत…’, संभाजीराजे छत्रपतींचं विधान चर्चेत

स्वामी प्रसाद मौर्य यांच्या या विधावावरून मोठा वाद पेटण्याची शक्यता आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच स्वामी प्रसाद मौर्य यांनी अयोध्येतील रामललाच्या अभिषेक कार्यक्रमाला फसवणूक म्हटले होते. सरकार अयोध्येत प्राणप्रतिष्ठा करण्याचा आव आणून देशातील तरुणांची आणि जनतेची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असल्याचे विधान स्वामी प्रसाद मौर्य यांनी केले होते.

    follow whatsapp