Telangana Exit Poll Result 2023: तेलगंणामध्ये मोठा उलटफेर.. Exit Poll मध्ये काँग्रेसला प्रचंड बहुमत

रोहित गोळे

30 Nov 2023 (अपडेटेड: 01 Dec 2023, 03:28 PM)

Telangana Assembly Election Exit Poll Result: तेलंगणाचे एक्झिट पोल आत सुरू झाले आहेत. तेलंगणात कोणाचे सरकार बनणार हे एक्झिट पोल जवळपास स्पष्ट करेल. येथे काँग्रेस, बीआरएस आणि भाजपमध्ये तिरंगी लढत आहे.

mumbaitak

mumbaitak

follow google news

Telangana Assembly Election 2023 Exit Poll: तेलंगणातील 119 जागांसाठी आज (30 नोव्हेंबर) मतदान पार पडलं. दुपारी 3 वाजेपर्यंत 51.89 टक्के मतदान झाले होते. तेलंगणात काँग्रेस, बीआरएस आणि भाजपमध्ये तिरंगी लढत होत आहे. 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. मात्र, त्याआधी सर्वजण एक्झिट पोलची वाट पाहत आहेत. आज संध्याकाळी 5.30 नंतर एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे. केसीआर यांचा पक्ष बीआरएस तेलंगणात पुन्हा सत्तेत येईल की निकाल वेगळा असेल हेच एक्झिट पोलमध्ये संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.

हे वाचलं का?

LIVE UPDATE:

  • तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान पूर्ण, एक्झिट पोलला सुरुवात
  • बीआरएस आणि काँग्रेसमध्ये जोरदार लढत होणार
  • बीआरएसला 36 टक्के, काँग्रेसला 42 टक्के तर , भाजपला 14 आणि एमआयएम 3 टक्के मतं मिळणार असल्याची शक्यता
  • तेलंगणामध्ये बीआरएस 34-44, काँग्रेसला 63-76, भाजप 4-8 आणि एमआयएमला 5-7 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
  • एमआयएमला मागच्या वेळेपेक्षा अधिक जागा मिळणार
  • भाजप आणि काँग्रेसने एकत्र येत एमआयएमच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी प्रयत्न
  • बीआरएसकडून ही निवडणूक फक्त विकासाच्या मुद्यावर लढवली गेली
  • के चंद्रशेखर राव यांनी नव्या योजना घेऊन ते मतदारांपुढं गेले, मात्र काँग्रेसनेही मोठं मोठी अश्वासन दिली
  • तेलंगणामध्ये काँग्रेस जर विजयी झाले तर त्याचा परिणाम देशातील अनेक निवडणुकीवर होणार
  • तेलंगणामध्ये सत्ताविरोधा लाट असल्याचे चित्र, कारण राज्यात बदल पाहिजे असल्याचे चित्र
  • तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून रेवंथ रेड्डी यांना मतदारांची पसंदी

 

BRS ने 2018 मध्ये जिंकलेल्या 88 जागा

2018 च्या विधानसभा निवडणुकीत BRS ने 119 पैकी 88 जागा जिंकल्या होत्या, तर कॉंग्रेसने 19 जागा जिंकल्या होत्या आणि AIMIM ने 6 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपने केवळ एकच मतदारसंघ जिंकला होता. नंतर काँग्रेसचे 12 आमदार हे बीआरएसमध्ये गेले होते.

या टीव्ही चॅनेल्स आणि एजन्सींचे सर्वेक्षण चर्चेत

इंडिया टुडे Axis My India
एबीपी-सी वोटर
टाइम्स नाऊ
न्यूज24 टुडे चाणक्या
इंडिया टीव्ही
जी न्यूज
न्यूजएक्स-नेता
रिपब्लिक-जन की बात
सीएसडीएस
न्यूज18-आयपीएसओएस

    follow whatsapp