India pakistan Tension: भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांदरम्यान युद्धजन्य परिस्थिती आहे. याचपार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधील विमानतळे बंद करण्यात आली आहेत. भारतातील एकूण 32 विमानतळे बंद करण्याबाबत एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियानं सूचना जारी केलीय. सर्व नागरी उड्डाणांसाठी विमानतळ तात्पुरते बंद करण्यात येणार असल्याचं घोषित केलंय.
ADVERTISEMENT
एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियानं सूचना केली जारी
एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार, ही उड्डाणे 9 ते 14 मे 2025 पर्यंत बंद असल्याचं सांगण्यात येतंय. ज्यात बीकानेर, जैसलमेर, जोधपूर, किशनगढ, थोईस, उत्तरलाई यांचा समावेश आहे.
हेही वाचा : पाकिस्तान खोटेपणा करत वेड्यात काढतंय, विक्रम मिसरी यांनी केली पोलखोल
- अधपमुर
- थॉइस
- उत्तरलाई
- अंबाला
- अमृतसर
- शिमला
- श्रीनगर
- अवंतीपुर
- भठिंडा
- सरसावा
- शिमला
- भुज
- बीकानेर
- पोरबंदर
- राजकोट (हीरासर)
- चंदीगड
- हलवारा
- पटियाला
- पोरबंदर
- हिंडन
- जैसलमेर
- पठानकोट
- पटियाला
- जम्मू
- जामनगर
- जोधपुर
- कांडला
- केशोद
- किशनगढ़
- कुल्लू मनाली (भुंतर)
- लेह
- लुधियाना
- मुंद्रा
- नलिया
ही विमानतळं सध्या पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत.
मुंबई विमानतळ सुरू की बंद?
मुंबई विमानतळ हे राज्यातीलच नाहीतर देशातील आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी एक महत्त्वाचं विमानतळ आहे. तर अशातच इतर 32 ते 34 विमानतळं बंद राहणार आहेत. ज्यात मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा समावेश नसल्याचं संबंधित ट्विटमध्ये सांगण्यात आलंय. त्यामुळं मुंबई आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानांची उड्डाणं सुरूच राहणार आहे. पण येथून केवळ मर्यादित विमानांचंच उड्डाण होईल. मात्र, यासाठी अनेकदा प्रवाशांना जास्त वेळ वाट पाहावी लागू शकते, असं सांगण्यात येतंय.
रेल्वेकडून विशेष गाड्या
भारत पाकिस्तान तणावजन्य परिस्थितीत भारतीय रेल्वेनं विशेष रेल्वे गाड्या सुरू ठेवल्या आहेत. रेल्वेचे सीपीआरओ हिमांशु शेखर उपाध्याय म्हणाले की, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पूर्ण परिस्थितीचा आढावा जाणून घेतला. अशातच त्या ठिकाणी अडकलेल्या लोकांच्या बचावासाठी रेल्वे चालू ठेवण्याचे निर्देश जारी केलेत.
हेही वाचा : रात्र वैऱ्याची... रात्रभर सुरू होते पाकिस्तानचे हल्ले, तुमच्या-आमच्या रक्षणासाठी जीवपाड लढतयं लष्कर!
जम्मू, उधमपूर आणि कटराद्वारे स्पेशल रेल्वेनं जम्मू, उधमपूर आणि कटारातून दिल्लीतील एकूण पाच विशेष रेल्वे सुरू ठेवण्यात आल्या आहेत. गरूवारी रात्री एक रेल्वे ट्रेन दिल्लीतील सफदरगंज ठाणे येथे पोहोचली. ज्यात आयपीएलचे पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटलचे खेळाडू धर्मशाळेतून वंदे भारत रेल्वेच्या माध्यमातून जलांधर येथे पोहोचले.
ADVERTISEMENT
