Ram Mandir : ‘फडणवीसांच्या वजनामुळे बाबरी पडली..’, उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

प्रशांत गोमाणे

• 09:48 AM • 30 Dec 2023

मी अयोध्येत कधीही जाईन आणि रामलल्लाचं दर्शन घेईन. पण राम मंदिर उद्घाटनाचा पॉलिटिकल इव्हेंट होऊ देऊ नका. मला रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी कुणाच्या निमंत्रणाची गरज नाही.

uddhav thackeray criticize devendra fadnavis ayodhya ram temple inaugration maharashtra politics

uddhav thackeray criticize devendra fadnavis ayodhya ram temple inaugration maharashtra politics

follow google news

Uddhav Thackeray Criticize Devendra Fadnavis, Ram Mandir : राम मंदिर सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरून भाजप शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. या आरोप-प्रत्यारोपात आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) जोरदार हल्ला चढवला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या वजनानेच बाबरीचा ढाचा पडला असावा, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच फडणवीस यांचा गृहपाठ कमी पडत असावा, असा टोला देखील त्यांना हाणला आहे. (uddhav thackeray criticize devendra fadnavis ayodhya ram temple inaugration maharashtra politics)

हे वाचलं का?

अजित पवार गटातील संजय वाघेरे यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरासह विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं. राम मंदिराच्या निमंत्रणावर बोलताना ठाकरे म्हणाले की, राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण काही आलं नाही. पण त्यासाठी शिवसेनेने खुप मोठा लढा आणि संघर्ष केला. राम मंदिर आणि हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून स्वत: शिवसेना प्रमुखाचा मतदानाचा अधिकार हिसकावून घेतला होता. त्यावेळी अनेक कारसेवकांनी रक्त सांडलं होतं, तुरुंगवास भोगला. त्यामुळे कोणी काय करत असलं तरी अयोध्येत राम मंदिर होणे ही आनंदाची बाब असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

हे ही वाचा : Exclusive Interview: राजीव गांधी ते मनमोहन सिंग… PM मोदी म्हणतात ‘हा’ देशातील सर्वात वाईट काळ!

बाबरीचा ढाचा पाडताना शिवसैनिक कुणीच नव्हते, असे देवेंद्र फडणवीसांचे विधान असल्याचा प्रश्न पत्रकारांनी ठाकरेंना केला होता. यावर ठाकरे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस स्वत: च चढले असतील आणि त्यांच्याच वजनाने पडली असतील तर मला माहिती नाही, त्यावेळेला सु्ंदर सिंह भंडारी वगैरे त्यांचेच होते, असे ते म्हणाले. त्यावेळेस लालकृष्ण अडवाणींनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यात अडवाणी आणि भंडारी यांनी शिवसेनेचं योगदान सांगितलं आहे. त्यामुळे फडणवीस यांचा गृहपाठ कमी पडत असावा, असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना मारला.

मी अयोध्येत कधीही जाईन आणि रामलल्लाचं दर्शन घेईन. पण राम मंदिर उद्घाटनाचा पॉलिटिकल इव्हेंट होऊ देऊ नका. मला रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी कुणाच्या निमंत्रणाची गरज नाही. मी आजही जाऊन दर्शन घेऊ शकतो. मुख्यमंत्री होण्यापूर्वी आणि नंतरही मी तिकडे गेलो होतो. 22 तारखेलाच गेलं पाहिजे असं नाही. तो काही एकमात्र मुहूर्त नाही. त्यांना जो इव्हेंट करायचा आहे. तो त्यांनी करू नये, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

    follow whatsapp