Uddhav Thackeray : “आता तुम्ही अतिरेक्यांना शेतकरी समजायला लागलात”, ठाकरेंचा मोदींवर घणाघात

भागवत हिरेकर

01 Feb 2024 (अपडेटेड: 01 Feb 2024, 08:06 AM)

Uddhav Thackeray Latest Marathi News : “दहा वर्ष झाल्यानंतर नंतर तुम्हाला चार जाती कळल्या. अरे अदाणी वगैरे म्हणजे देश नाही. ज्याच्यासाठी तुम्ही आयुष्यातील दहा वर्षे खर्ची घातली”, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अंतरिम अर्थसंकल्पानंतर घणाघात केला. (Uddhav Thackeray Recites PM Modi over Nirmala Sitharaman budget speech) उद्धव ठाकरे रायगड दौऱ्यावर असून, पेण […]

Uddhav Thackeray Again Targets pm Modi on Adani issue

Uddhav Thackeray Again Targets pm Modi on Adani issue

follow google news

Uddhav Thackeray Latest Marathi News : “दहा वर्ष झाल्यानंतर नंतर तुम्हाला चार जाती कळल्या. अरे अदाणी वगैरे म्हणजे देश नाही. ज्याच्यासाठी तुम्ही आयुष्यातील दहा वर्षे खर्ची घातली”, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अंतरिम अर्थसंकल्पानंतर घणाघात केला. (Uddhav Thackeray Recites PM Modi over Nirmala Sitharaman budget speech)

हे वाचलं का?

उद्धव ठाकरे रायगड दौऱ्यावर असून, पेण शहरात जनसंवाद सभा झाली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “कल्याणमध्ये शाखाभेटी ठरवल्या आणि सभाच झाल्या. एका लोकसभा मतदारसंघात जितके विधानसभा मतदारसंघ येतात तितक्या मतदारसंघात जाणार आणि माझ्या जनतेला भेटणार.”

ठाकरेंनी सीतारामन यांचं केलं अभिनंदन

उद्धव ठाकरे म्हणाले, “आपण आज इथे संवाद करतोय आणि त्याचवेळी देशातला मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी सादर केला आहे. निर्मला सीतारामन यांना धन्यवाद देतो की, जड अंतःकरणाने का होईल तुम्ही शेवटचा अर्थसंकल्प मांडला.”

हेही वाचा >> Income Tax Slab मध्ये ना दिलासा, ना भार! किती भरावा लागणार आयकर?

“मी अर्थसंकल्पात सीतारामन बाई असं म्हणाल्या की, देशात आम्ही चार जातींसाठी काम करणार आहोत. गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी. अर्थमंत्र्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी मोठं धाडस केलं. पंतप्रधानांसमोर हे धाडस केलंय की, हा देश म्हणजे सुटाबुटातील मित्र नाहीत. त्या पलिकडे सुद्धा देश आहे, तो हा आहे”, अशा शब्दात ठाकरेंनी सुनावले.

“अदाणी वगैरे म्हणजे देश नाहीये”

गौतम अदाणींचं नाव घेत ठाकरेंनी मोदी सरकारला लक्ष्य केलं. ते म्हणाले, “दहा वर्ष झाल्यानंतर नंतर तुम्हाला चार जाती कळल्या. अरे अदाणी वगैरे म्हणजे देश नाही. ज्याच्यासाठी तुम्ही आयुष्यातील दहा वर्षे खर्ची घातली, हा तेवढा देश नाहीये. सुटाबुटातील सरकार आता गरिबांकडे लक्ष द्यायला आलेलं आहे.”

हेही वाचा >> भाजप 400 जागा जिंकू शकतं का? प्रशांत किशोरांची मोठी भविष्यवाणी

“सीतारामन जी महिलांकडे तुम्ही लक्ष देत आहात, तर मग मणिपूरमध्ये का जात नाही आहात? मणिपूरमध्ये त्या महिलांना जाऊन सांगा की आम्हाला माहिती नव्हतं आपल्या देशात महिला आहेत. आता आम्हाला कळलं, कारण निवडणुकीत आम्हाला महिलांची मतं पाहिजे आहेत. कारण महिलांची मते पाहिजे आणि महिलांसाठी काम करणार.”

बिलकिस बानो, शेतकरी आंदोलनांवरून सुनावले खडेबोल

उद्धव ठाकरे या सभेत म्हणाले, “बिलकिस बानोकडे जा. अत्याचार करणाऱ्यांना तुम्ही सोडलं होतं. आता कोर्टाच्या आदेशाने आत टाकलं. आता तिच्याकडेही जा आणि सांगा ताई तू सुद्धा महिला आहे, तुझ्यासाठीही आम्ही काम करणार आहोत.”

तीन शेतकरी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी भाजपच्या काही नेत्यांनी आंदोलन शेतकऱ्यांचे अतिरेक्यांशी संबंध असल्याचे म्हटले होते. त्यावरून ठाकरेंनी निशाणा साधला. “वर्षभर उत्तरेतल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. थंडी, वारा, ऊन, पाऊस कशाची पर्वा न करता आंदोलन केलं, त्यांना तुम्ही अतिरेकी ठरवलं होतं. आता अतिरेक्यांना तुम्ही शेतकरी समजायला लागलात आणि आता तुम्ही त्यांचं काम करायला लागलात. हे सगळं थोतांड आहे”, असे ठाकरे म्हणाले.

    follow whatsapp