Shiv Sena vs BJP: उल्हासनगर: उल्हासनगर महापालिकेच्या आगामी निवडणुकीत राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. भाजपला धक्का देत शिवसेना आणि टीम ओमी कलानी (TOK) यांनी हातमिळवणीची घोषणा केली आहे. युतीनंतर कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे आणि ओमी कलानी एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला.
ADVERTISEMENT
उल्हासनगर शहराच्या राजकारणात कलानी कुटुंबाचा प्रभाव नेहमीच निर्णायक ठरत होते. तसेच अनेक वर्ष तुरुंगवास भोगल्यानंतर सध्या बाहेर असलेले माजी आमदार सुरेश ऊर्फ पप्पू कलानी हे पुन्हा सक्रिय झाल्याने राजकीय वातावरण अधिक रंगतदार झाले आहे. मात्र, दोन विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभव, कधी राष्ट्रवादी, कधी भाजप आणि आता शिंदेंची शिवसेनेसोबत युती करून स्वतःचे अस्तित्व वाचण्याची लढाई सुरू आहे.
उल्हासनगरमधील नेमकं राजकारण काय?
◆ 2024 विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार कुमार आयलानी यांच्या समोर टीओके+राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ओमी कलानी यांनी निवडणूक लढवली होती. मात्र ओमी कलानी पराभव झाले.
हे ही वाचा>> IPS अंजना कृष्णा यांना 'इतना डेरिंग...' असं म्हणणाऱ्या अजितदादांचं स्पष्टीकरण, म्हणाले.. 'मला तर महिला अधिकाऱ्यांचा सर्वोच्च आदर..'
◆ आता उल्हासनगर महापालिकेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कुणाची तरी साथ हवी म्हणून टीम ओमी कलानीने शिंदेंची शिवसेनेसोबत युती केली आहे. या युतीला दोस्तीची गठबंधन असं नाव दिलं आहे. मात्र, भाजपासोबत जाऊन महापौर पद मिळवलं आणि ओमी कलानी यांची पत्नी पंचम कलानी यांना महापौर पदावर बसवलं.
◆ महापौराचं पद आपल्या पदरात पाडून घेतल्यानंतर त्यांनी भाजपाची साथ सोडत त्यावेळच्या शिवसेनेला महापौर पदाच्या निवडणुकीत भाजप उमेदरवाराऐवजी शिवसेनेला मदत केली होती. टीम ओमी कलानीच्या 21 नगरसेवकांच्या पाठिंब्यावर शिवसेनेच्या लीलाबाई आशान ह्या महापौर झाल्या होत्या. त्यामुळे भाजपला सत्तेतून पाय उतार व्हावे लागले होते.
◆ आपलं काम झाल्यावर त्याच भाजप सोबत दुरावा साधणारी टीम ओमी कलानी शिवसेना शिंदे गटासोबत तरी प्रामाणिक राहील का? की आपलं काम झाल्यावर तसाच काहीसा राजकीय गेम खेळणार तर नाही ना अशी चर्चा सध्या शहरात सुरू आहे. दुसरीकडे टीम ओमी कलानीला महायुतीत घेण्यासंदर्भात भाजपाची काय भूमिका राहील ते देखील पाहावं लागणार आहे.
◆ मात्र गेल्या काही वर्षांपासून भाजप आणि कलानी गटामध्ये राजकीय वैर वाढलेले आहे. महापालिका आणि विधानसभेत एकमेकांना सत्तेबाहेर ठेवण्याची भूमिका दोन्ही गटांनी घेतली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीदरम्यान टीओकेने खासदार श्रीकांत शिंदे यांना खुली मदत केली होती. त्यानंतर शिंदे आणि ओमी कलानी यांची जवळीक वाढली होती, तेव्हा शहरभर दोस्ती का गठबंधनचे बॅनर झळकले होते.
हे ही वाचा>> 'ये बाबा येना...' आजोबा नातवाचा पहिला दोस्त.. एकनाथ शिंदेंच्या Video मागची क्यूट स्टोरी! व्हिडिओ तुफान व्हायरल
◆ नुकत्याच झालेल्या धार्मिक कार्यक्रमात खा. शिंदे आणि ओमी कलानी यांनी एकाच वाहनातून प्रवास करून या चर्चेला आणखी जोर दिला होता. त्यानंतर कलानी यांनी शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन स्थानिक प्रश्नांवर चर्चा केली होती. दरम्यान, भाजपने कलानी गटातील काही निष्ठावंतांना आपल्या गळाला लावत पक्षप्रवेश करून कलानींना धक्का दिला होता. मात्र, त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे स्थानिक नेते कलानी यांच्या बंगल्यावर दाखल झाले आणि शिवसेना-टीओके युतीची घोषणा करण्यात आली.
◆ आगामी उल्हासनगर महापालिका निवडणुकीत टीम ओमी कलानीचे तब्बल 15 नगरसेवकांचा शिवसेनेला जाहीर पाठिंबा असल्याचे यावेळी ओमी कलानी यांनी स्पष्ट केले. तसेच आगामी निवडणुका शिवसेना समवेत एकत्रित लढण्याची इच्छा ही यावेळी ओमी कलानी यांनी व्यक्त केली.
◆ या युतीनंतर उल्हासनगर महापालिकेची लढत अधिक चुरशीची होणार असून भाजप आता काय रणनीती आखते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
◆ आगामी उल्हासनगर महापालिका निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता काबीज करण्याचे ठरविले, मात्र शिवसेना-टीओके युतीमुळे भाजपला एकहाती सत्ता महापालिकेत आणण्याची स्वप्ने भंग पावली आहेत.
◆ मागील महापालिकेत ह्याच गठबंधनाने सत्ता उपभोगली होती. टीम ओमी कलानीच्या 21 नगरसेवकांच्या पाठिंब्यावर शिवसेनेच्या लीलाबाई आशान ह्या महापौर झाल्या होत्या. त्यामुळे भाजपला सत्तेतून पाय उतार व्हावे लागले होते. त्यामुळे पुन्हा एकदा हाच प्रयोग करून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न दोन्ही पक्ष करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोस्तीचा गटबंधनमुळे आगामी निवडणुकीतील लढत अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
ADVERTISEMENT
