'ये बाबा येना...' एकनाथ शिंदे आजतकशी साधत होते संवाद, नातवाची अचानक एंट्री, व्हिडिओ तुफान व्हायरल

Eknath Shinde And Rudrandsh : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजतकशी संवाद साधत होते. यामुलाखतीदरम्यान, मुंबई तकचे संपादक साहिल जोशी बोलताना एकनाथ शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे यांचा भन्नाट हास्यास्पद किस्सा समोर आला आहे. त्यांचा व्हिडिओही प्रचंड व्हायरल होताना दिसतोय.

eknath shinde

eknath shinde

मुंबई तक

04 Sep 2025 (अपडेटेड: 04 Sep 2025, 04:21 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

एकनाथ शिंदे आणि रुद्रांशची बॉन्डिंग

point

ये बाबा येना... मुलाखतीदरम्यान रुद्रांश काय म्हणाला?

point

व्हिडिओ तुफान व्हायरल

Eknath Shinde And Rudrandsh : राजकीय नेते हे आपलं वैयक्तिक आयुष्य राजकारणापासून अनेकदा वेगळं ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. पण, काहीही केलं तरीही असा एक योगायोग येतोच जिथे राजकारण्यांचं वैयक्तिक आयुष समोर येतंच. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजतकशी संवाद साधत होते. यामुलाखतीदरम्यान, मुंबई तकचे संपादक साहिल जोशी बोलताना एकनाथ शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे यांचा भन्नाट हास्यास्पद किस्सा समोर आला आहे. त्यांचा व्हिडिओही प्रचंड व्हायरल होताना दिसतोय.

हे वाचलं का?

हे ही वाचा : तिहेरी हत्याकांडानं रत्नागिरी हादरलं! आधी बारमध्ये काम करणाऱ्या दोघांचा केला गेम, नंतर गर्लफ्रेंडचा वायरने गळा आवळून...

'ये अजोबा येना...'  नातवाचा अन् आजोबाचा किस्सा 

आजोबा हा नातवाचा पहिला दोस्त असतो, आणि नातू हा आजोबाचा शेवटचा दोस्त असल्याचं बोललं जातं. अशीच बॉन्डिग एकनाथ शिंदे आणि रुद्रांश शिंदेची बघायला मिळाली होती. त्या दोघांचाही व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. ये अजोबा येना... असा दमच आता नातू रुद्रांश आपल्या आजोबांना देताना दिसत आहे. तसेच आजोबाही तितक्याच प्रेमाने आपल्या नातवाचं मन राखत आदेश ऐकत आहेत.

आजोबा आणि नातवाचं संभाषण

आजोबा आणि नातवाचं हे संभाषण एक गोड आठवण असल्याची दिसून येत आहे. मुलाखत सुरु होताना रुद्रांशमुळे आलेला हा व्यत्यय, याला स्वीट डिस्टर्बन्सही म्हणता येईल. राज्याचा कारभार चालवणारे नेते तसेच मंत्री एकनाथ शिंदे कुठेतरी आपल्या नातवासमोर त्याचा दोस्त होताना दिसतात. शिंदेंचे आणि त्यांच्या नातवाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसतात.

हे ही वाचा : वय सरत चाललंय लग्न होत नाही म्हणून...लेकाचा संपात अन् आईचीच केली हत्या, थरकाप उडवणारी घटना समोर

भल्याभल्यांना आदेश देणारे, सिस्टीम चालवणारे हे खमके आजोबा हात जोडून आपल्या नातवाला अगदी धाकही देतात आणि नंतर गालातल्या गालात हसतातही, त्यामुळे राजकीय नेत्यांचं वास्तव आणि त्याचं राजकीय जीवन हे दोन्ही घटक नाण्याच्या एक बाजू असल्यातरी वेगवेगळ्या आहेत.

    follow whatsapp