Vidhan Parishad Election 2026 : महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी पार पडत असलेल्या निवडणुकीचं चित्र आता स्पष्ट झालंय. या निवडणुकीसाठी 18 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. आज म्हणजे गुरुवार (दि.4) निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. महायुतीच्या नेत्यांनी ताकद लावल्यानंतर 6 जागा बिनविरोध करण्यात त्यांना यश आलंय. मात्र, उर्वरित 11 जागांवर लढत होणार आहेत. कोणत्या जागा बिनविरोध झाल्या? कोणत्या जागांवर कोणा-विरोधात कोण लढणार? याची माहिती जाणून घेऊयात..
ADVERTISEMENT
हेही वाचा : 'कपडे हो गए छोटे...' Video झाला व्हायरल अन् अनिताने LIVE येऊन घेतलं विष!
महायुतीच्या बिनविरोध जागा
1.वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर : अरुण लखाणी
2.पुणे: विक्रम काकडे
3.ठाणे :रवींद्र फाटक
4.रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग : अनिकेत तटकरे
5.यवतमाळ - दुष्यंत चतुर्वेदी ( शिवसेना शिंदे गट)
6 अहिल्यानगर – प्राजक्त तनपुरे – भाजप (होण्याची शक्यता, अपक्षाचा खोटी सही घेऊन अर्ज माघारी घेतल्याचा आरोप)
दरम्यान, सध्या अहिल्यानगरची जागा बिनविरोध झाली असली तरी अपक्ष उमेदवाराने आक्षेप घेतलाय. उमेदवारी मागे घेण्याच्या अर्जावर सुचकाची सही खोटी केल्याचा दावा केलाय.. अपक्ष उमेदवाराने थेट जिल्हाधिकार्यांसमोर आत्महत्येचा इशारा दिलाय.. अहिल्यानगरचे अपक्ष उमेदवार दत्ता पानसरे यांनी थेट जिल्हाधिकार्यांसमोर आत्महत्येचा इशारा दिला आहे. पानसरे यांच्या उमेदवारी माघारीसाठी एका सुचकाने अर्ज दाखल केला होता. मात्र, "माझा अर्ज मागे घेण्यासाठी सुचकाची जी सही वापरण्यात आली, ती पूर्णपणे खोटी आहे," असा गंभीर आरोप दत्ता पानसरे यांनी केला आहे.
हेही वाचा : Govt Jobs : भारतीय नौदलात अग्निवीर भरती, चाळीस हजार पगार अन् लाखोंचा फंड, 'असा' करा अर्ज
खालील जागांवर होणार निवडणूक
7. छ.संभाजीनगर – सुहास शिरसाट – भाजप विरूध्द गणेश लोखंडे अपक्ष
8. नाशिक – नरेंद्र दराडे (शिवसेना) विरुध्द गोकुळ गीते (भाजप बंडखोर)
9. सोलापूर – राजेंद्र राऊत भाजप विरुध्द वसंत देशमुख राष्ट्रवादी शप
10. नांदेड – अमर राजूरकर – भाजप विरुध्द कृष्णा आष्टीकर ( मविआ पुरस्कृत)
11. नागपूर – राजू पोतदार – भाजप विरुध्द अतुल लोंढे (काँग्रेस)
12. सांगली – सातारा – धैर्यशील कदम – भाजप विरूध्द अभयसिंग जगताप (राष्ट्रवादी शप)
13. धाराशिव - बसवराज पाटील भाजप विरुध्द महेश देशमुख काँग्रेस
14. जळगांव – नंदकिशोर महाजन भाजप विरुध्द शरद तायडे (शिवसेना UBT) विरूध्द रेश्मा काळे (शिंदे बंडखोर)
15. परभणी सईद खान शिवसेना विरूध्द विवेक नावंदर – शिवसेना UBT
16. भंडारा –गोंदिया भाजप – अविनाश ब्राह्मणकर विरूध्द नरेश ईश्वरकर (अपक्ष) ,सचिन कुंभलकर (अपक्ष)
17. अमरावती – प्रवीण पोटे पाटील (भाजप) विरुध्द हर्षजीत देशमुख (काँग्रेस)
ADVERTISEMENT











