अमित शाहांनी भाजपच्या आमदारांना दिली दोनदा संधी, पण शेवटी 'मुख्यमंत्री' म्हणून... वाचा Inside Story

रोहित गोळे

08 May 2026 (अपडेटेड: 08 May 2026, 06:26 PM)

West Bengal Chief Minister: पश्चिम बंगालमध्ये भाजपचा आगामी मुख्यमंत्री कोण असणार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीर केलं. पण त्याआधी नेमकं काय घडलं याची इनसाइड स्टोरी नक्की जाणून घ्या.

Mumbai Tak
Google CTA

Amit Shah and BJP West Bengal CM: कोलकाता: पश्चिम बंगालच्या राजकारणात आज (8 मे) इतिहास घडला आहे. कोलकाता येथे झालेल्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराला अंतिम स्वरूप देण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी स्वतः बंगालच्या मुख्यमंत्री पदी कोण असणार त्या नावाची घोषणा केली. अमित शाहा आणि ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांच्या उपस्थितीत आमदारांनी एकमताने मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराची निवड केली. 

हे वाचलं का?

मुख्यमंत्री निवडण्यासाठी अमित शाहांनी दोन वेळेस दिली आमदारांना संधी

अमित शाहा यांनी बंगालच्या मुख्यमंत्री पदी कोणाचं नाव जाहीर केलं हे जाणून घेण्याआधी आपण या सगळ्या घडामोडीमधील एक इंटरेस्टिंग कहाणी आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

प. बंगालमध्ये अभूतपूर्व यश मिळविणाऱ्या भाजपचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत मागील काही दिवसांपासून बरीच चर्चा सुरू होती. ज्यावरून अखेर आज पडदा हटला आहे. केंद्रीय गृहमंत्री यांचीच बंगालमध्ये पर्यवेक्षक म्हणून पक्षाने निवड केली होती. त्यामुळे सर्व नवनिर्वाचित आमदारांचं म्हणणं ऐकून त्यांना बंगालमधील मुख्यमंत्री पदी कोण असणार याची घोषणा करायची होती.

हे ही वाचा>> PM Modi: 'जिथे भाजप तिथे...', बंगालमध्ये 'कमळ' फुलताच PM मोदींनी दिली 'ती' गॅरंटी!

अखेर अमित शाह यांनी मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली हे जाहीर केलं. पण त्याआधी बोलताना अमित शाह यांनी एक गोष्ट स्पष्ट केली.

ते म्हणाले, 'काही दिवसांपूर्वी निवडणूक पार पडली. त्यानंतर जवळजवळ 8 प्रस्ताव आणि समर्थन आम्हाला मिळाले आहेत. त्या सगळ्या प्रस्तावात आणि समर्थन पत्रात एकाच नावाचा उल्लेख आहे.'

'त्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी दुसऱं नाव कोणतं असावं यासाठीही आमदारांना पुरेसा वेळ देण्यात आला होता. पण कोणतंही दुसरं नाव आलेलं नाही. यामुळे केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून मी शुभेंदू अधिकारी यांची प. बंगाल विधिमंडळ नेते म्हणून निवड झाल्याचे घोषित करतो.'

शुभेंदू अधिकारींच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ

याचाच अर्थ ज्या शुभेंदू अधिकारी यांनी माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव केला त्यांच्याच गळ्यात भाजपने मुख्यमंत्री पदाची माळ टाकली. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने कट्टर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बंगालमध्ये प्रचार केला होता. ज्याचा चेहरा बनलेले शुभेंदू अधिकारी.

हे ही वाचा>> मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेल्या सुवेंदू अधिकारींच्या PA च्या डोक्यातच झाडल्या गोळ्या, जागीच मृत्यू

शुभेंदू अधिकारी हे एकेकाळी ममता बॅनर्जी यांचे कट्टर समर्थक समजले जायचे. ममता बॅनर्जींच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री देखील होती. मात्र, काही वर्षांपूर्वी त्यांनी TMC ची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून ते सातत्याने ममता बॅनर्जी यांना टक्कर देत होते. बंगालमधील 2021 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शुभेंदू अधिकारी हेच विधानसभे विरोधी पक्ष नेते होते.

मात्र, यंदा भाजपला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर पक्षाने शुभेंदू अधिकारी यांनाच मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. शुभेंदू अधिकारी हे उद्या (9 मे) सकाळी 11 वाजता कोलकाता येथील ऐतिहासिक ब्रिगेड परेड मैदानावर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

9 मे.. बंगालसाठी खास दिवस

9 मे हा बंगालसाठी एक अत्यंत विशेष दिवस आहे, कारण या दिवशी रवींद्र जयंती आहे. या शुभप्रसंगी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार असून, बंगालमधील पहिल्या भाजप सरकारचा शपथविधी सोहळा पार पडेल. भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव करणाऱ्या शुभेंदू यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्र्यांचाही शपथविधी पार पडेल अशी सध्या चर्चा सुरू आहे. ज्यामुळे राज्यात नवीन राजकीय समीकरणे पाहायला मिळू शकतात.

बंगालचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी 7 मे रोजी राज्य विधानसभा विसर्जित केली. कोलकाता गॅझेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेत्रदीपक विजयानंतर विधानसभा विसर्जित करण्याचे हे पाऊल उचलण्यात आले आहे, असे म्हटले जात आहे.