नांदेड विधानपरिषद : महायुती आणि मविआत कडवा संघर्ष, अशोक चव्हाणांना निवडणूक जड जाणार?

Nanded Vidhan parishad Election 2026 : नांदेड विधान परिषद निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील संघर्षामुळे निवडणूक अतितटीचे होणार असल्याचे बोलले जात आहे.

मुंबई तक

04 Jun 2026 (अपडेटेड: 04 Jun 2026, 05:13 PM)

follow google news

Nanded Vidhan parishad Election 2026 : नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत संघर्ष दिसून येत असून, त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. भाजप, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे ही निवडणूक आता बहुरंगी झाली आहे. सर्वच प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवल्याने निवडणुकीतील चुरस अधिकच वाढली आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : मोठी बातमी : विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचा धमाका, किती जागा बिनविरोध? संपूर्ण यादी

अशोक चव्हाण यांच्यासाठी  निवडणूक कितपत सोपी की जड?

या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त चर्चा ही भाजपचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांच्या उमेदवारीची होत आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राजूरकर यांना उमेदवारी मिळाल्याने ही निवडणूक भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. अशोक चव्हाण यांच्यासाठी ही विधान परिषद निवडणूक कितपत सोपी किंवा जड जाणार, यावर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. राजूरकर यांची उमेदवारी निश्चित झाल्याने नांदेडच्या राजकारणात नवे समीकरण तयार झाले आहे.

निवडणुकीच्या गणितावर नजर टाकल्यास, सध्या कोणत्या उमेदवाराकडे किती मते आहेत आणि कोणाचे पारडे जड आहे, याचे विश्लेषण करणे महत्त्वाचे ठरत आहे. प्रत्येक पक्षाची ताकद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील बलाबल पाहता, ही निवडणूक अटीतटीची होण्याची चिन्हे दिसत आहेत. उमेदवारांची नेमकी ताकद काय आहे आणि मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने असेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या अंतर्गत वादामुळे मतदानावर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

'कपडे हो गए छोटे...' Video झाला व्हायरल अन् अनिताने LIVE येऊन घेतलं विष!