इंग्लडने टीम इंडियाची पिसं काढली, 555 रन्सपर्यंत मजल

मुंबई तक

• 02:44 PM • 06 Feb 2021

चेन्नई कसोटीचा दुसरा दिवस हा खऱ्या अर्थाने गाजवला तो इंग्लिश बॅट्समनने. कारण दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने 8 विकेट गमावून तब्बल 555 रन्सचा टप्पा गाठला आहे. यावेळी इंग्लंडचा कर्णधार जो रुन याने डबल सेंच्युरी देखील झळकावली आहे. 218 रन्सची मॅरेथॉन इनिंग खेळणाऱ्या रुटने या मॅचमध्ये एक नवा रेकॉर्ड रचला आहे. 100 व्या टेस्ट मॅचमध्ये डबल सेंच्युरी झळकविणारा […]

Mumbaitak
follow google news

चेन्नई कसोटीचा दुसरा दिवस हा खऱ्या अर्थाने गाजवला तो इंग्लिश बॅट्समनने. कारण दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने 8 विकेट गमावून तब्बल 555 रन्सचा टप्पा गाठला आहे. यावेळी इंग्लंडचा कर्णधार जो रुन याने डबल सेंच्युरी देखील झळकावली आहे. 218 रन्सची मॅरेथॉन इनिंग खेळणाऱ्या रुटने या मॅचमध्ये एक नवा रेकॉर्ड रचला आहे. 100 व्या टेस्ट मॅचमध्ये डबल सेंच्युरी झळकविणारा जो रुट हा जगातील पहिलावहिला फलंदाज ठरला आहे. दुसऱ्या दिवशी 128 धावांवरुन पुढे खेळताना लंचनंतर रुटने 341 बॉलमध्ये आपली डबल सेंच्युरी पूर्ण केली. ही त्याच्या करिअरमधील पाचवी डबल सेंच्युरी आहे. यावेळी त्याला पाचव्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आलेल्या बेन स्टोक्सची देखील चांगली साथ मिळाली. त्यांच्या याच इनिंग्सच्या जोरावर इंग्लंडने 555 रन्सचा पल्ला गाठला.

हे वाचलं का?

रुट आणि स्टोक्स यांनी पाचव्या विकेटसाठी 124 रनची पार्टनरशीप केली. यावेळी पहिल्या सेशनमध्ये टीम इंडियाच्या बॉलर्सला काहीही यश मिळालं नाही. तर दुसऱ्या सेशनमध्ये शाहबाज नदीमने भारताला एकमेव विकेट मिळवून दिली. त्याने स्फोटक फलंदाज बेन स्टोक्सला पुजाराकरवी कॅचआऊट केलं. स्टोक्सने 118 बॉलमध्ये 10 फोर आणि तीन सिक्सच्या मदतीने 82 रन केले होते.

यानंतर रुटने पुन्हा एकदा ओली पोपसोबत 86 रनची पार्टनरशीप करत इंग्लंडला भक्कम स्थितीत नेलं. यानंतर तिसऱ्या सेशनमध्ये अश्विनने पोपचा बळी घेत इंग्लंडला पाचवा धक्का दिला. त्यानंतर काही वेळातच नदीमने इंग्लंडचा कर्णधार जो रुट याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर जेव्हा इंग्लंडने ५२५ रनपर्यंत मजल मारली तेव्हा इशांत शर्माने सलग दोन बॉलवर दोन विकेट घेतले. त्याने जोस बटलर (30) आणि जोफ्रा आर्चर यांना क्लिन बोल्ड केलं. मात्र असं असलं तरीही तळाचा फलंदाज डोम बेसने 28 रन केले असून तो नाबाद आहे. त्यामुळे इंग्लंडने आतापर्यंत 555 रन्सचा डोंगर उभा केला आहे. अद्यापही त्यांनी आपली इनिंग डिक्लेअर केलेली नाही. त्यामुळे चेन्नई टेस्टच्या तिसऱ्या दिवशी देखील इंग्लंडचे बॅट्समन बॅटिंग करताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता तळाच्या बॅट्समनला झटपट बाद करुन टीम इंडियाला आपल्या इनिंगची चांगली सुरुवात करावी लागणार आहे.

दरम्यान, पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाच्या बॉलर्सला फारशी काही चमक दाखवता आली नाही. चेपॉकच्या खेळपट्टीवर भारतीय स्पिनर्स यशस्वी होतील अशी सगळ्यांना आशा होती. मात्र, तीनही स्पिनर्सने खूपच निराशा केली.

    follow whatsapp