इंग्लंड क्रिकेट संघातील ३ खेळाडू आणि ४ सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने याबद्दल माहिती दिली आहे. कोणत्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाली हे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने अजुन जाहीर केलेलं नसलं तरीही Vitality T20 Blast आणि पाकिस्तानविरुद्धची मालिका नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच पार पडेल अशी माहिती ECB ने दिली आहे.
ADVERTISEMENT
पाकिस्तानविरुद्ध लिमीटेड ओव्हर सिरीजमध्ये बेन स्टोक्स इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. दरम्यान या सातही जणांच्या संपर्कात आलेल्या खेळाडूंनी स्वतःला आयसोलेट करुन घेतलं आहे. ब्रिस्टलमध्ये सोमवारी खेळाडूंची कोरोना चाचणी घेण्यात आली. ज्यात ७ जणांचे रिपोर्ट पॉजिटीव्ह आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात ३ वन-डे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. ८ जुलैपासून या मालिकेला सुरुवात होईल. पाकिस्तानविरुद्धची मालिका खेळल्यानंतर इंग्लंड भारताविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
ADVERTISEMENT
