Ruturaj Gaikwad : 6 चेंडूत 7 षटकार! ऋतुराजचं तुफानी द्विशतक, युवराज सिंगचा विक्रमही मोडला

मुंबई तक

• 08:10 AM • 28 Nov 2022

सोमवारी झालेल्या विजय हजारे ट्रॉफीच्या सामन्यामध्ये इतिहास रचला गेला आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांच्यातील सामन्यात चाहत्यांना एकाच षटकात सात षटकार पाहायला मिळाले. हा विक्रम इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाडने केला असून, त्याने येथे उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातही द्विशतक झळकावले आहे. उत्तर प्रदेशविरुद्धच्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राने 50 षटकांत 5 […]

Mumbaitak
follow google news

सोमवारी झालेल्या विजय हजारे ट्रॉफीच्या सामन्यामध्ये इतिहास रचला गेला आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांच्यातील सामन्यात चाहत्यांना एकाच षटकात सात षटकार पाहायला मिळाले. हा विक्रम इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाडने केला असून, त्याने येथे उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातही द्विशतक झळकावले आहे.

हे वाचलं का?

उत्तर प्रदेशविरुद्धच्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राने 50 षटकांत 5 गडी गमावून 330 धावा केल्या. कर्णधार ऋतुराज गायकवाडने अवघ्या 159 चेंडूत 220 धावांची नाबाद खेळी केली, या खेळीत त्याने 10 चौकार आणि 16 षटकार मारले. डावाच्या 49 व्या षटकात ऋतुराज गायकवाडने 7 षटकार मारले तेव्हा. हे पाहुन सर्वांनीच तोंडात बोटं घातली.

एकाच षटकात 7 षटकार…

25 वर्षीय ऋतुराज गायकवाडने डावाच्या 49व्या षटकात 7 षटकारांसह एकूण 43 धावा केल्या. ज्यामध्ये एक चेंडू नो-बॉल होता, असं करणारा ऋतुराज गायकवाड हा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.

• 48.1 षटके – 6 धावा

• 48.2 षटके – 6 धावा

• 48.3 षटके – 6 धावा

• 48.4 षटके – 6 धावा

• 48.5 षटके – 6 धावा (नो-बॉल)

• 48.5 षटके – 6 धावा (फ्री-हिट)

• 48.6 षटके – 6 धावा 6 धावा

या सामन्यात ऋतुराज गायकवाड याच्याशिवाय अन्य कोणताही फलंदाज महाराष्ट्रासाठी विशेष काही करू शकला नाही. दोन फलंदाजांनी 37-37 धावांची खेळी केली, पण बाकी सर्वजण दुसऱ्या टोकाकडून ऋतुराजच्या खेळीचा आनंद घेत राहिले. या सामन्यात यूपीच्या गोलंदाजांवरही वाईट वेळ आली, शिवा सिंग 9 षटकात 88 धावा देऊन सर्वात महागडा ठरला.

ऋतुराज गायकवाडने हे विक्रम केले

• लिस्ट-ए क्रिकेटमधले त्याचे पहिले द्विशतक

• लिस्ट-ए क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा (४३ धावा समतुल्य) • एका षटकात ७ षटकार मारणारा पहिला फलंदाज

• यादी- ११वा भारतीय A क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा खेळाडू

एका षटकात सर्वाधिक धावांचा विक्रम (लिस्ट-ए क्रिकेट)

• ४३ धावा: ऋतुराज गायकवाड – महाराष्ट्र वि. उत्तर प्रदेश, नोव्हेंबर २०२२ (भारत)

• ४३ धावा: बी. हॅम्प्टन आणि जे. कार्टर – नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट विरुद्ध सेंट्रल डिस्ट्रिक्ट, नोव्हेंबर 2018 (न्यूझीलंड)

ऋतुराज गायकवाडचा विक्रम

25 वर्षीय ऋतुराज गायकवाड महाराष्ट्रातून आला आहे, तो आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जमधून खेळतो. त्याने टीम इंडियासाठी वनडे आणि टी-२० फॉरमॅटमध्ये पदार्पण केले आहे. ऋतुराजने टीम इंडियासाठी 1 वनडे, 9 टी-20 सामने खेळले आहेत. जर आपण त्याचा लिस्ट-ए रेकॉर्ड पाहिला तर त्याने 69 सामन्यांमध्ये 55 च्या सरासरीने 3538 धावा केल्या आहेत.

    follow whatsapp