WTC Final: काहीही अशक्य नाही.. द. आफ्रिकेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा केला पराभव, मिळवलं कसोटीचं जगज्जेतेपद!

Australia vs South Africa, WTC Final 2025: जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात, ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेसमोर 282 धावांचे लक्ष्य ठेवले होते. ज्याचा यशस्वी पाठलाग करत आफ्रिकेने कसोटीचं जेतेपद मिळवलं.

WTC फायनलमध्ये द. आफ्रिकेचा विजय (फोटो सौजन्य: AP)

WTC फायनलमध्ये द. आफ्रिकेचा विजय (फोटो सौजन्य: AP)

मुंबई तक

14 Jun 2025 (अपडेटेड: 14 Jun 2025, 05:34 PM)

follow google news

लंडन: आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) च्या तिसऱ्या फेरीच्या (2023-25) अंतिम (Final) सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव करून अत्यंत ऐतिहासिक असा विजय मिळवला आहे. तब्बल 27 वर्षानंतर द. आफ्रिकेने दुसऱ्यांदा आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे. 

हे वाचलं का?

आज (14 जून) लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या सामन्याच्या चौथ्या दिवशी द. आफ्रिकेने 5 विकेट बाकी ठेवून ऑस्ट्रेलियावर दणदणीत असा विजय मिळवला.

27 वर्षांनी द. आफ्रिकेने पटकावली ICC ट्रॉफी

दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात सुमारे 282 धावांचा यशस्वी पाठलाग केला.  दक्षिण आफ्रिकेने 1998 मध्ये त्यांचे एकमेव आयसीसी जेतेपद जिंकले होते. ज्यानंतर तब्बल 27 वर्षांनी त्यांना हा इतिहास रचला.

हे ही वाचा>> शुभमन गिलच्या कर्णधारपदानंतर... रवींद्र जडेजा म्हणाला, मला व्हायचंय...

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 282 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 212 आणि दुसऱ्या डावात 207 धावा केल्या होत्या. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 138 धावांमध्येच आटोपला होता. त्यामुळे पहिल्या डावाच्या आधारे ऑस्ट्रेलियाला 74 धावांची आघाडी मिळाली होती.

पण दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ हा 207 धावाच करू शकला. त्यामुळे द. आफ्रिकेसमोर 282 धावांचं आव्हान ठेवण्यात आलं होतं.

मार्करमचं शतक आणि कर्णाधार टेम्बा बावुमाची झुंजार खेळी

दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करताना, दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात 70 धावांवर आपला दुसरा बळी गमावला होता. पण येथून एडेन मार्करम आणि कर्णधार टेम्बा बावुमा यांनी अत्यंत संयमी खेळ केला. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 147 धावांची भागीदारी केली, हीच भागीदारी या विजयात मोलाची ठरली.

हे ही वाचा>> "तुमच्यासारख्या अनुभवी...", विराट कोहलीची मनधरणी करताना BCCI ने काय म्हटलं?

या भागीदारीदरम्यान, मार्करामने 101 चेंडूत 11 चौकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील आठवे शतक होते. आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत शतक झळकावणारा मार्कराम हा पहिलाच दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज ठरला आहे.

दुसरीकडे, टेम्बा बावुमा हॅमस्ट्रिंग दुखापतीशी झुंजत असूनही एक उत्तम खेळी करण्यात यशस्वी ठरला. बावुमाने 134 चेंडूत बहुमूल्य 66 धावा केल्या, ज्यामध्ये पाच चौकारांचा समावेश होता. बावुमाला कर्णधार पॅट कमिन्सने धावबाद केले. त्यानंतर मार्कराम आणि डेव्हिड बेडिंगहॅम यांनी पाचव्या विकेटसाठी 35 धावांची भागीदारी केली आणि दक्षिण आफ्रिकेला विजयाच्या जवळ आणले. जेव्हा दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 6 धावांची आवश्यकता होती, तेव्हा मार्कराम बाद झाला. मार्करामला जोश हेझलवूडने धावबाद केले. मार्करामने 207 चेंडूत 14 चौकारांसह 136 धावा केल्या.

    follow whatsapp