ठाणे : भिवंडी शहरातील कल्हेर परिसरात मार्च 2024 मध्ये घडलेल्या एका महिलेच्या आत्महत्येप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. महिलेच्या प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या बहिणीने नुकत्याच केलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल झाला. यामध्ये आरोपीच्या नावासह काही नोट्स सापडल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश, 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, नेमकं कारण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता रीता साहनी (वय 25) ही 22 मार्च 2024 रोजी कल्हेर येथील तिच्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली होती. पीडितेच्या बहिणीने तक्रारीत म्हटलं आहे की, तिला एका कपाटाखाली लपवलेली शाळेची वही आणि वैयक्तिक डायरी सापडली.
डायरीमध्ये काय लिहिलेलं होतं?
डायरीत रीताने लिहिलं होतं की, ती उत्तर प्रदेशमधील नवनीत राजपूत याच्यासोबत रिलेशनमध्ये होती. मात्र, नवनीत दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करत असल्यानं ती तणावात होती. तसंच, तिने आपल्या नोट्समध्ये नवनीतवर तिला फसवल्याचा आणि धमकावल्याचा आरोपही केला आहे.
हे ही वाचा >>गोदामाला आग, मालक आणि कामगार अडकले, होरपळून दोघांचाही अंत, प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
दरम्यान, या तक्रारीआधारे आणि पुरवलेल्या पुराव्यांच्या आधारावर भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. भारतीय दंड संहितेच्या कलम 108 (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत नवनीत राजपूत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असून, आरोपीचा शोध सुरू केला आहे.
ADVERTISEMENT
