Rudraksh patil won gold medal in Asian Game :एशियन गेम्समध्ये (Asian Game) ठाण्याच्या (Thane) रुद्राक्ष पाटील (Rudraksh Patil) आणि त्याच्या टीमने सुवर्णपदक पटकावले आहे. दहा मीटर रायफल शूटिंग स्पर्धेत रुद्राक्ष पाटील आणि त्याच्या टीमने बाजी मारत सुवर्ण कामगिरी केली आहे. भारताच्या या नेमबाजांनी केलेल्या या सुवर्ण कामगिरीचे देशभरात कौतुक होत आहे. (asian games 2023 thane rudraksh patil and team won gold medal in 10 meter air rifle)
ADVERTISEMENT
एशियन गेम्समध्ये टीमसह सुवर्णपदक जिंकलेला रुद्राक्ष पाटील हा पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचा मुलगा आहे. रुद्राक्षने देशाला सुवर्णपदक मिळवून दिल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांकडून ही त्याचं कौतुक केल जात आहे. रुद्राक्षने देशासाठी सुवर्ण कामगिरी केल्याने आम्हाला तसच देशालाही त्याचा अभिमान असल्याच सांगत आम्ही कुटुंब म्हणून कायमच त्याच्यासोबत असल्याचे बाळासाहेब पाटील यावेळी म्हणाले आहेत.
हे ही वाचा : Raju Patil: ‘रोहित पवारांना ‘ती’ टीप मिळाली असेल’, भाजपबाबत मनसेच्या आमदाराचं मोठं विधान
रूद्राक्षच्या या कामगिरीवर बाळासाहेब पाटील यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत बाळासाहेब पाटील म्हणाले की, आज सकाळी ही बातमी ऐकूण खूप आनंद झाला. रूद्राक्षच्या कष्टाच चीज झालं. देशासाठी पहिल सुवर्ण पदक मिळतंय, याचा आनंद आमच्या संपूर्ण कुटुंबाला झाला असल्याचे बाळासाहेब पाटील म्हणाले आहेत.
एशियन गेम्स, कॉमनवेल्थ स्पर्धा ऑलिम्पिकच्या तयारीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या स्पर्धा आहेत. एशियन्स गेम्स खेळताना प्रत्येकावरच तणाव असतो. अपेक्षा खूप असतात, त्यामुळे या अपेक्षा पुर्ण करता येतील की नाही, असे अनेकांच्या डोक्य़ात प्रश्न असतात. त्यामुळे त्याचा गेमवर परिणाम होतो. पण रूद्राक्षच्या टीमने चांगला कामगिरी केल्याचे बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
चीनचा रेकॉर्ड ब्रेक
रुद्राक्षने ऐश्वर्य प्रताप सिंग आणि दिव्यांश सिंग पानवार यांच्यासोबत सुवर्णपदकावर नाव कोरलं. रूद्राक्ष पाटील आणि संघाने केलेल्या या कामगिरीमुळे पॅरीसमध्ये 2024 साली ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे स्थान पक्के केले आहे. या तिघांनी क्वालिफिकेशन राउंडमध्ये 1893.7 पॉईट्स मिळवले. यासोबत तिघांनी बाकू वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये चीनने केलेला याआधीचा वर्ल्ड रेकॉर्डही मोडला.
हे ही वाचा : Crime : माणुसकीला काळीमा! 1500 रूपयांसाठी अनुसूचित जातीच्या महिलेला नग्न करून मारहाण,चेहऱ्यावर लघवी…
टीम इंडियाच्या महिला संघाने पटकावलं सुवर्णपदक
कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने एशियन गेम्समध्ये इतिहास रचला आहे. टीम इंडियाच्या महिला ब्रिगेडने या स्पर्धेत पहिलं वहिलं गोल्ड जिंकलं आहे. श्रीलंकेचा 19 धावांनी पराभव करून टीम इंडियाने हे पदक जिंकले आहेत. त्यामुळे एशियाडमधील पुरुष आणि महिला क्रिकेटमधील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे.
ADVERTISEMENT
