IPL 2021 भारतामध्येच, BCCI कडून तयारीला सुरुवात

मुंबई तक

• 08:04 AM • 31 Jan 2021

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरात अजुनही कायम असताना…बीसीसीआयने आयपीएलचा चौदावा सिझन भारतात आयोजित करण्याची तयारी सुरु केली आहे. मुंबईतील वानखेडे, ब्रेबॉन…नवी मुंबईतील डी.वाय. पाटील आणि रिलायन्स क्रिकेट स्टेडीअम तर पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिशनच्या मैदानावर सामन्यांचं आयोजन करण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. BCCI चे खजिनदार अरुण धुमाळ यांनी पीटीआयशी बोलताना ही माहिती दिली. याबद्दल माहिती देताना अरुण […]

Mumbaitak
follow google news

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरात अजुनही कायम असताना…बीसीसीआयने आयपीएलचा चौदावा सिझन भारतात आयोजित करण्याची तयारी सुरु केली आहे. मुंबईतील वानखेडे, ब्रेबॉन…नवी मुंबईतील डी.वाय. पाटील आणि रिलायन्स क्रिकेट स्टेडीअम तर पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिशनच्या मैदानावर सामन्यांचं आयोजन करण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. BCCI चे खजिनदार अरुण धुमाळ यांनी पीटीआयशी बोलताना ही माहिती दिली.

हे वाचलं का?

याबद्दल माहिती देताना अरुण धुमाळ म्हणाले…

“भारतात आयपीएलचं आयोजन व्हावं यासाठी आम्ही तयारी करत असून आम्हाला खात्री आहे की स्पर्धा भारतातच आयोजित केली जाईल. सध्याच्या घडीला आम्ही पर्यायी जागेचा विचारही करत नाहीयोत, आम्हाला आता ही स्पर्धा भारतातच आयोजित करायची आहे. युएईच्या तुलनेत सध्याच्या घडीला भारत हा चांगला पर्याय आहे. आयपीएलच्या आयोजनापर्यंत परिस्थिती अशाच पद्धतीने नियंत्रणात राहून त्यात सुधारणा होईल अशी आम्हाला आशा आहे.”

याव्यतिरीक्त अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडीयमचाही या स्पर्धेसाठी विचार करण्यात येत असून, इथे बाद फेरीचे सामने खेळवण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. मात्र या सर्व गोष्टींवर अंतिम निर्णय हा आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलमध्ये घेतला जाणार आहे. कोरोनाच्या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आयपीएल २०२० चं आयोजन बीसीसीआयने युएईमध्ये केलं होतं.

परंतू नवीन वर्षात कोरोनाची लस बाजारात आल्यानंतर प्रादुर्भाव आटोक्यात येत आहे. कोरोनाचा धोका टळलेला नसला तरीही सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेचं आयोजन करुन बीसीसीआयने भारतातही क्रिकेट स्पर्धांचं आयोजन यशस्वीपद्धतीने केलं जाऊ शकलं हे दाखवून दिलं. ५ फेब्रुवारीपासून इंग्लंडचा संघ भारतात ४ टेस्ट, ५ टी-२० आणि ३ वन-डे खेळण्यासाठी येत आहे. त्यामुळे हा दौरा यशस्वी पद्धतीने आयोजित केल्यानंतर बीसीसीआय घरच्या मैदानावर आयपीएलचं आयोजन यशस्वीपद्धतीने करु शकणार आहे.

दरम्यान बीसीसीआयने यंदाच्या सिझनमधील रणजी ट्रॉफीची स्पर्धा रद्द केली असून यंदा फक्त विजय हजारे ट्रॉफीचं आयोजन बीसीसीआय करणार आहे. दरम्यान १८ फेब्रुवारीला चेन्नईत बीसीसीआयने चौदाव्या सिझनचं ऑक्शन आयोजित केलं आहे.

    follow whatsapp